ममता कुलकर्णीचं सेमी न्यूड फोटोशूवर मोठं वक्तव्य, ‘तेव्हा मी व्हर्जिन होती आणि सेक्सबद्दल…’

Mamta Kulkarni: 'तेव्हा मी व्हर्जिन होती आणि सेक्सबद्दल...', संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीचं न्यूड फोटोशूवर मोठं वक्तव्य, मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर केलं मोठं वक्तव्य

ममता कुलकर्णीचं सेमी न्यूड फोटोशूवर मोठं वक्तव्य, तेव्हा मी व्हर्जिन होती आणि सेक्सबद्दल...
ममता कुलकर्णी
| Updated on: Feb 02, 2025 | 1:13 PM

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने तिच्या करीयरमध्ये अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान यांच्यापासून अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत अभिनेत्री स्क्रिन शेअर केली. बॉलिवूडमध्ये करीयर यशाच्या शिखरावर असताना ममता अचानक गायब झाली. त्यानंतर अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अंडरवर्ल्ड डॉनसोबत देखील होऊ लागली. पण आता संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

नुकताच झालेल्या एक मुलाखतीत ममता कुलकर्णी हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. मुलाखतीत ममता हिने सेमी न्यूड फोटोशूटवर देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.

ममता कुलकर्णी ‘आपकी अदालत’ शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये रजत शर्मा यांनी ममता हिला अनेक प्रश्न विचारले. ‘स्टारडस्ट’ मॅगझीनसाठी अभिनेत्रीने केलेल्या सेमी न्यूड फोटोशूटबद्दल रजत शर्मा यांनी ममता कुलकर्णी हिला प्रश्न विचारले.

 

 

यावर ममता कुलकर्णी म्हणाली, ‘स्टारडस्टच्या लोकांनी मला डेमी मूर यांचा एक फोटो दाखवला, जो मला अश्लील वाटला. तेव्हा मी निरागस होती. इयत्ता ननवी मध्ये शिकत होती. तेव्हा मी एक वक्तव्य केलं होतं की, मी अद्याप व्हर्जीन आहे. लोकांना माझ्या वक्तव्याचा विरोध केला…’

पुढे ममता म्हणाली, ‘मला सेक्सबद्दल देखील काही माहिती नव्हतं. जोपर्यंत तुम्हाला सेक्सबद्द काही माहिती नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच चुकीचं वाटणार नाही. त्यामुळे मला न्यूड फोटोंबद्दल देखील काहीही माहिती नव्हतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही मी 23 वर्षात पॉर्नोग्राफी किंवा पॉर्न व्हिडीओ पाहिलेला नाही…’ असं देखील ममता म्हणाली.

‘छत पर सोया था बहनोई’ गाण्यावर ममताची प्रतिक्रिया

मुलाखतीत रजत शर्मा यांनी ‘छत पर सोया था बहनोई’ गाण्यावर प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘हा प्रश्न तुम्ही माधुरी दीक्षित हिला किंवा कोणत्या डान्सरला विचारायला हवा. आम्ही फक्त डान्स स्टेपवर लक्ष देतो. आमचं पूर्ण लक्ष आमच्या डान्स स्टेपवर असतं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.