
मुंबई | 31 डिसेंबर 2023 : बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) कायम त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत अनेक दमदार भूमिकांना न्याय देत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर फक्त आणि फक्त मनोज बाजपेयी याचं राज्य आहे. मनोज बाजपेयी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आता अभिनय विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर खुद्द मनोज बाजपेयी यांनी उत्तर देखील दिलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
सांगायचं झालं तर, मनोज बाजपेयी कुटुंबासह गावी बेलवा याठिकाणी पोहोचले आहेत. गावी पोहोल्यानंतर मनोज लेकीसोबत स्वतःच्या शाळेत पोहोचले. तेथे अभिनेत्याने शाळेतील मुलांसोबत गप्पा देखील मारल्या. एवढंच नाही तर, अभिनेते मनोज बाजपेयी यांनी आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांची भेट देखील घेतली.
आज कुछ है नहीं करने के लिए तुम्हारे पास तो भक से उलट दिये ! ब्कलोले बाड? https://t.co/Dsv2AWpTWD
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) December 30, 2023
बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे मनोज बाजपेयी राजकारणात प्रवेश करणार का? या चर्चांनी जोर धरला आहे. यावर खुद्द मनोज बाजपेयी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. पण सोशल मीडिया युजर्सन कसं समजेल? असं मनोज बाजपेयी म्हणाले.
एका युजर ट्विट करत म्हणाला, ‘निवडणुका येणार आहेत, आता मनोज बाजपेयींना समाजसेवक बनायचे आहे. लालूजी यांच्याकडून तिकीटचं वचन घेतलं आहे.’ यावर उत्तर देत मनोज बाजपेयी म्हणाले, ‘आज तुमच्याकडे काही करण्यासारखं नाही म्हणून… बोलून टाकलं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनोज बाजपेयी यांची चर्चा रंगली आहे.
मनोज बाजपेयी कायम स्वतःच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ सिनेमाला प्रेक्षकांना पसंती दर्शवली. मनोज बाजपेयी याने ‘द फॅमिली मॅन’, ‘सत्या’, ‘गुलमोहर’, ‘जोराम’, ‘शुटआऊट एट वडाला’, ‘स्पेशल 26’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
सोशल मीडियावर देखील मनोज बाजपेयी कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मनोज बाजपेयी कायम त्यांच्या आगामी सिनेमांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. मनोज बाजपेयी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.