
इंडियाज गॉट लॅटेंट हा समय रैनाचा शो आणि युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या वादात सापडले आहेत. सर्वत्र त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेक ठिकाणी, अनेक संघटनांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच सध्या त्यांची पोलीस चौकशीही सुरु आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. रणवीरने पालकांच्या प्रायव्हसीवरून विचारलेला प्रश्न चांगलाच महागात पडला आहे.
समय आणि रणवीरविरोधात सेलिब्रिटींचीही संतप्त प्रतिक्रिया
रणवीरच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत त्याच्यावर टीका केली केली आहे. तो एक उत्तम युट्यूबर म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा पोडकास्टच्या शोला सर्वजणच पसंत करायचे. मात्र आता या प्रकरणामुळे नक्कीच त्याच्या चांगल्या प्रतिमेला तडा गेला आहे.
एवढंच नाही तर लोकप्रिय गायक बी प्राकने रणवीरबरोबरची आगामी पॉडकास्ट मुलाखत रद्द केली आहे. तर, सोशल मीडियावर समय रैनाच्या या शोवर कारवाई केली जावी, हा शो बंद करण्यात यावा अश मागणी करण्यात येत आहे. समय आणि रणवीरविरोधात सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत तेसच सोशल मीडियावरही टीका होतेय, राग व्यक्त केला जात आहे.
मराठी अभिनेत्याची रणवीर आणि समयवर आगपाखड
यातच आता एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत या दोघांवर संताप व्यक्त केला आहे. ‘शिव्या, XX,XX,कितीवेळा XXX करतोस? हेच चालू असतं. अच्रटपणा आहे सगळा” असं बरंच काही म्हणत या अभिनेत्याने पोस्ट करत या दोघांवरही टीका केली आहे.
हा मराठी अभिनेता आहे पुष्कर जोग. पुष्करने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत रणवीर अलाहाबादिया तसेच समय रैनाबद्दल संताप व्यक्त केला आहे. या शोमध्ये अतिशय अश्लील, अचरटपणा चालतो असा दावा पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे.
काय म्हणाला पुष्कर ?
“‘India’s Got Latent’ या समय रैनाच्या शोमध्ये अतिशय अश्लील, अचरटपणा चालतो. तुमची वैचारिक घाण महाराष्ट्रात आणू नका. नुसता फालतूपणा असतो. शिव्या, XX, XX, कितीवेळा XXX करतोस हेच चालू असतं. अरे ही कॉमेडी नाही. हा अचरटपणाचा कळस आहे. रणवीरने सुद्धा अतिशय चुकीचं विधान केलं. पण, याला कारणीभूत समय रैना आहे. माझा जाहीर निषेध… जोग बोलणार…” अशी पोस्ट शेअर करत पुष्करने समय रैनाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
दोघांविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
दरम्यान, याप्रकरणी आता NCW तसेच NHRC यांच्याविरोधात नोटीस पाठवली आहे. अनेक ठिकाणी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रणवीर आणि समयच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. तसेच हा शो बंद करण्याची मागणीही होत आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल रणवीरने सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र तरीही त्यांच्याबद्दलचा रोष हा कमी होताना दिसत नाहीये. आता पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.