Anita Date: असं वाटतं की सेटवर आपलं शोषण होतंय..; माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
Anita Date On Shooting: माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने नुकतीच एक मुलाखत दिली असून आता त्याचा मुलाखतीची जोरदार चर्चा सुरु आहे.

Anita Date Kelkar Interview: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनिता दाते तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. छोट्या पडद्यावर उत्तम भूमिका साकारणारी अनिताची सध्या एक मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. अनिता सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आलीये.
एका मुलाखतीत अनिता दाते म्हणाली की, “एक मालिका करत असताना ती मालिका तुमचे वयच वाढवते, हा माझा अनुभव आहे, समजा जा मी चार वर्ष मालिका करतेय, म्हणजे तेरा तास काम करते. याचा अर्थ माणसं आठ तास काम करतात, आम्ही करतोय तेरा तास काम, त्याच्यापलीकडे घरी जायचा वेळ, परत यायचा वेळ हा येतो, तो वेगळा हा, तुमचा फॅमिली लाईफ राहत नाही, तुम्ही स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही, तुम्हाला शांतता नसते, तुमचे केस, तुमची त्वचा, तुमचं शरीर, हे दुप्प्टीने काम करत असतं.”
“एवढे लाईट्स, त्याच्यानंतर मेकअप, तुमचं तिथे थांबणं, रिटेक्स, डायलॉड, मेंदू, त्यानंतर आपल्याला हवी असलेली नको असलेली सगळी माणसं तिथेच, त्यानंतर आपल्याला सतत वाटत राहतं की आपलं शोषण होतंय, विविध पद्धतीने वाटत राहतं की आपलं शोषण होतंय, की अरे एक्सट्रा थोडं काम करायचं झालं की तर ते वाटतं राहतं, वाईट साडी आली तर वाटत राहतं, म्हणजे तुम्ही इतके सेन्सिटिव्ह होऊन जातात ना, की तुम्हाला सतत वाटतं की आपलं शोषण होतंय, दुसऱ्याला जास्त डायलॉग येणं हेही कधी कधी त्रासदायक होतं”. असं अनिता म्हणाली.
अनिताने आतापर्यंत दमदार प्रॉजेक्यमध्ये काम केले आहे. चित्रपट असो, नाटक असो किंवा मालिका असो अनिताने प्रत्येक भूमिका गाजवली आहे. आता अनिता माझ्या बायकोचा नवरा या नाटकात काम करत आहे. अनिताने माझ्या नवऱ्याची बायको, नवा गडी, नवं राज्य या मालिकेत काम केले आहे, तर तुबांड, मी वसंतराव, वाळवी …अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आहे.