
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकच्या वैवाहिक जीवनाची जोरदार चर्चा सुरु होती. दोघांमधील वाद हे सर्वांसमोर आले होते. मात्र, नंतर मानसीने घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मानसी आणि प्रदीप खरेरा यांचा घटस्फोट चांगलाच गाजला. आता प्रदीप खरेरा पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकला आहे. त्याने दुसऱ्यांद लग्न केले आहे. आता त्याची दुसरी बायको आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
लग्नानंतर नवीन जीवनाचा प्रारंभ
प्रदीप खरेरा हा मराठी उद्योगातील एक प्रसिद्ध चेहरा आहे, जो अभिनयासोबतच इतर क्षेत्रांतही सक्रिय आहे. मानसी नाईकसोबतच्या वैवाहिक जीवनानंतर त्याने आता नव्या जोडीदारासोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये प्रदीप आणि त्याची नववधू पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. लग्नाच्या रिअल्समधील एक व्हिडीओमध्ये प्रदीप पत्नीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तसेच ते दोघे फेरे घेताना दिसले. अनेकांनी प्रदीपला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मानसी नाईकची प्रतिक्रिया काय?
मानसी नाईकने स्वतः या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करत ती विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. प्रदीपसोबतच्या घटस्फोटानंतर मानसीने वैयक्तिक जीवनाबाबत फारशी ओपन चर्चा केली नाही, पण तिचे चाहते यशस्वी करिअरमुळे आनंदी आहेत. दुसरीकडे, प्रदीपने लग्नानंतर सोशल मीडियावर काही हलके-फुलके अपडेट्स शेअर केले असून, त्यातून त्याचे नवीन जीवन सुखी असल्याचे सूचित होत आहे.
सोशल मीडियावर खळबळ
प्रदीपच्या दुसऱ्या लग्नामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ पाहायला मिळते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर #PardeepKhareraWedding सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. काही चाहते या लग्नाला शुभेच्छा देत असतील, तर काही मानसीच्या भावनांचा विचार करत आहेत. एका व्हिडीओमध्ये प्रदीपची जोडीदार पारंपरिक साडीत सजलेली दिसत असून, संपूर्ण सोहळा भव्य आणि भावनिक असल्याचे कळते. प्रदीपच्या दुसऱ्या बायकोचे नाव विशाखा पनवार आहे. ती देखील एक अभिनेत्री आहे.