Sonali Kulkarni: ‘पॅड नाही जुन्या साड्यांचे कपडे आणि…’, पहिल्या मासिक पाळीवर सोनाली कुलकर्णीचा मोठा खुलासा
Sonali Kulkarni: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम तिच्या अनुभवांबद्दल सांगत असते, अभिनेत्रीत्या तिच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल देखील मोठा खुलासा. मासिक पाळीत अभिनेत्रीला वापरण्यासाठी पॅड दिला नाही तर, जुन्या साड्यांचे कपडे दिलेले... जाणून घ्या अभिनेत्री नेमकं काय म्हणाली.

Sonali Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही, अभिनेत्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोनाली तिने साकारलेल्या भूमिकांमुळे कायम चर्चेत असते. पण अभिनेत्री आयुष्यात आलेले अनुभव देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, सोनाली हिने पहिल्या मासिक पाळीबद्दल सांगितलं आहे. पहिली मासिक पाळी आली तेव्हा अभिनेत्रीला पॅड नाही वापण्यासाठी जुन्या साडीचं कापड देण्यात आलं होतं, ते कापड एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरावं लागायचं… जाणून सोनाली नेमकं काय म्हणाली.
मुलाखतीत सोनाली म्हणाली, ‘मी अशा कुटुंबातून येते, जेथे मासिक पाळी आल्यानंतर पॅड मिळत नाही. आम्हाला जुन्या साड्यांचे नरम तुकडे वापरण्यासाठी दिले जायचे… आम्हाला शिकवलं जायचं की, ते कापड कसं वापरायचं… कसं कापड स्वच्छ धुतल्यानंतर वाळत टाकायचे आणि सुकल्यानंतर ते कापड पुन्हा वापरायचं…’
पुढे सोनाली म्हणाली, ‘मला पहिली मासिक पाळी आल्यानंतर माझ्या कुटुंबियांनी छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. माझ्या आईने आणि मावशीने माझी आरती केली होती. दोघी प्रेमाने माझ्याकडे पाहत होत्या… आता सोनाली मोठी झाली… असं त्यांची भावना होती. मला देखील चांगलं वाटत होतं. असं वाटत होतं माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालं आहे.’, सोनाली असं देखील म्हणाली, ‘मासिक पाळीबद्दल आपल्या समाजात आजही काही मागासलेले विचार आहेत. पण असं नाही व्हायला पाहिजे…’
यावेळी सोनाली हिने इंडस्ट्रीमध्ये आलेला भयानक अनुभव देखील सांगितला. कास्टिंग काऊचच्या आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सोनाली म्हणाली, ‘दिग्दर्शकाने भूमिकेच्या बदल्यात मला तडजोड करण्यास सांगितलं. दिग्दर्शकाने कथा सांगण्यासाठी मला एका बिल्डिंगंमध्ये बोलावलं होतं. तेथे नॅरेशन रुममध्ये बेड देखील होता…’, दिग्दर्शकाचा वाईट हेतू कळल्यानंतर सोनालीने सिनेमा करण्यास स्पष्ट नकार दिला.
सोनाली कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.