मराठमोळ्या अभिनेत्रीचं 2 वेळा अबॉर्शन, सातव्या महिन्यात गमावलं बाळ, नवराही सोबत नव्हता, कारण…
अभिनेत्रींचं आयुष्य दिसायला प्रचंड ग्लॅमरस आणि आकर्षक असतं. पण पडद्यामागचं त्यांचं आयुष्य फार खडतर असतं. करियर, लग्न, मुलं आणि जबबादारी... यामध्ये त्या अनेक प्रसंगांचा समाना करत असतात.

अभिनेत्री पडद्यावर येतात तेव्हा त्यांचं आयुष्य फार वेगळं असतं, पण वास्तव मात्र त्याहूनही वेगळं असतं. जे कधी समोर येत नाही. खासगी आयुष्यात अभिनेत्रींना अनेक संकटांचा समाना करावा लागतो. असंच काही एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडलं आहे. अभिनेत्रीला 2 वेळा अबॉर्शन करावं लागलं. एवढंच नाही तर, सातव्या महिन्यात अभिनेत्रीने तिचं बाळ गमावलं… या कठीण काळात तिचा नवरा देखील तिच्या सोबत नव्हता… सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्वाती देवल आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्वाती देवल हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘बाळामध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे माझी सातव्या महिन्यात डिलिव्हरी करण्यात आली. तेव्हा मी रेलीवालाच्या शुटिंगसाठी गेलेले. मी उड्या मारल्या, डान्स केला. त्यामुळे मला त्रास झासी, ती फ्रेज मी प्रचंड त्रासात काढली. खूप शारीरिक वेदना झाल्या. मानसिक खच्चीकरण होतं होतं, कामं येत नव्हती.’
मालिकेच्या शुटिंगबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, ‘तो काळ प्रचंड वाईट होता. पण मी ठरवलं होतं, जे मिळेल ते काम करायचं. मी ब्रेक घेतला नाही, त्यानंतर अचानक ‘कुलवधू’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. पण मी करु शकले नाही. कारण तेव्हाच अडचण सुरु झाली. पहिलाच सीन होता, दारु पिते, जिन्यांवरुन खाली पडते…’
तीन अबॉर्शनबद्दल काय म्हणाली स्वाती?
अभिनेत्री म्हणाली, ‘पहिल्या बाळावेळी असं घडलं. त्यानंतर दुसरं आणि तिसरं देखील अबॉर्शन झालं होतं. डान्स केल्यामुळे असं झालं. पण माहितीच नव्हतं की, प्रेग्नेंसी आहे म्हणून.. अबॉर्शनची प्रोसेस फार कठीण आहे. मला खूप त्रास झाला. पहिल्या प्रेग्नंसीच्या वेळेस मला जेव्हा कळलं की प्रोब्लेम आहे तेव्हा तुषार कॉमेडी एक्सप्रेस करत होता. त्याचं वॉटर किंगडमला शूट करत होता. तेव्हा मी एकटीच जाऊन एडमीट झाली.’ दुसऱ्या अबॉर्शनच्या वेळी देखील अभिनेत्री एकटीच होती.
पुढे स्वाती म्हणाली, ‘माझ्या तिन्ही अबॉर्शनच्या वेळेस तुषार नव्हता असं म्हणायला काहीही हरकत नाही. मला डॉक्टरकडे जावं लागायचं. त्यात त्यांची काय चूक नाही. तो कायम म्हणायचा की, येऊ का? पण त्याला येता यायचं नाही… हे सर्वकाही एकटीने झेपणं फार कठीण होतं… पण तिसऱ्या वेळेस तुषार खूप रडलेला. कारण माझ्या मनात प्रेग्नेंसीची भीती वाटली होती. आपल्यासोबत असं का घडत आहे? असं वाटयचं. आयुष्यात जे काही केलं आहे, ते तुषारसाठी केलं आहे.’ असं देखील स्वाती म्हणाली.