शूटिंगला स्वत:चे कपडे आणण्यापासून ते डिझायनर आऊटफिटपर्यंत…; छाया कदम यांच्यासाठी हेमांगी कवीची भावनिक पोस्ट

Hemangi Kavi Post For Chhaya Kadam : अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्री छाया कदम यांचं कौतुक करणारी हेमांगीची पोस्ट सध्या चर्चेत आहे. छाया कदम यांचा प्रवास या पोस्टमधून डोळ्यासमोर उभा राहतो. वाचा हेमांगी कवीची खास पोस्ट...

शूटिंगला स्वत:चे कपडे आणण्यापासून ते डिझायनर आऊटफिटपर्यंत...; छाया कदम यांच्यासाठी हेमांगी कवीची भावनिक पोस्ट
हेमांगी कवी, छाया कदम
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2024 | 7:33 PM

अभिनेत्री छाया कदम… दमदार अभिनय ही त्यांची ओळख… छाया कदम जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा त्यांच्या दोन वाक्यांमधील पॉजही बोलका असतो. छाया कदम त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकतात. मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. नुकतंच झालेल्या कान फेस्टिवललाही त्या पोहोचल्या होत्या. छाया कदम यांच्या याच कामाचं कौतुक अभिनेत्री हेमांगी कवी हिने केलं आहे. याबाबत अभिनेत्री हेमांगी कवीने एक खास पोस्ट शेअर केलीय. यात तिने शूटिंगला जातान स्वत:चे कपडे आणण्यापासून ते डिझायनर आऊटफिटपर्यंतचा छाया कदम यांचा प्रवास मांडला आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

Cannes ला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक achievement साठी तुझं खूप खूप कौतुक आणि अगणित शुभेच्छा. छायडे! तू तिथे जायच्या आधीही भारीच होतीस गं. मराठीतली तुझी सर्व कामं, हिंदीत झुंड, अंधाधुंद, गंगूबाई काठीयावाडी, आताचा लापता ladies, मडगाव express किती तरी सुंदर सुंदर कामं केलीस पण तुझं भारीपण आपल्या मराठी media च्या लक्षात यायला फार उशीर झाला असं मला वाटतं. त्यासाठी तुला परदेशी जाऊन यावं लागलं.

अक्षरश: डोक्यावर घेतलं! ‘देर आए दुरूस्त आए’ म्हणायचं. लोकांनीही तुझं कौतुक केलं, ते तुझ्याबद्दल आणखी आणखी वाचत होते कारण लोकांना वाचायला, तुला बघायला मज्जा येत होती. So यानिमित्ताने मला सर्व Media ला विनंती करावीशी वाटते की कुठल्या अभिनेत्रीने किती लग्नं केली, कुणाबरोबर फिरतेए, काय कपडे घातलेत, मुल का नाही असल्या फालतू आणि लोकांना bore करणाऱ्या बातम्यांपेक्षा तिच्या कामाबद्दल माहीती दिली, जमलं तर प्रसंशा केली तर बरं होईल आणि तुम्हांला social media var उत्तम engagement ही मिळेल. जशी तुम्ही छायाच्या वेळी मिळवलीत. असो.

एक असा काळ होता जेव्हा serial वाले तुला shooting साठी स्वतः चे कपडे आणत जा सांगायचे आणि आज, जगभरातले मोठमोठे designers तुला त्यांचे कपडे देऊ करताएत. क्या बात है. तुझ्या अभिनयाच्या achievements सोबत या achievement चं कौतुक वाटतंय मला, कारण आपल्याला माहीतीए गं ‘स्वतःचे कपडे आणा’ सांगितल्यावर काय वाटायचं.
बाकी तु कमाल थी, कमाल है और कमाल रहेगी!

We Love You! ❤️