‘प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’, विचार करायला लावणारा ‘भोंगा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

| Updated on: Jun 30, 2021 | 1:19 PM

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आपले नाव प्रत्येक सिनेप्रेमींच्या हृदयावर कोरले. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने वा कथेच्या जोरावर हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे.

‘प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’, विचार करायला लावणारा ‘भोंगा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
भोंगा पोस्टर
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आपले नाव प्रत्येक सिनेप्रेमींच्या हृदयावर कोरले. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने वा कथेच्या जोरावर हा ‘भोंगा’ चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. सततच्या आवाजाने लहान मुले, आजारी माणसे म्हणा वा वयोवृद्धांना त्रास होतोच मात्र त्यावर तोडगा हा काहीच निघत नाही (Film Bhonga based on social and environmental issue will released soon).

आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती अशा या समस्यांना दुजोराच देते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, आणि असेच दृश्य आणि मनाला चटका लावणारा विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे.

काय आहे नेमकी कथा?

‘भोंगा’ चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 24 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी पेलवली. तर ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित आहेत. तर चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत.

चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले असून या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास यांनी उत्तमरीत्या सांभाळली. अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी, अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचाही अभिनय पाहायला मिळणार आहे.

(Film Bhonga based on social and environmental issue will released soon)

हेही वाचा :

Photo : प्रचंड सुंदर आहे यामी गौतमची धाकटी बहीण, पाहा सुरीलीचे खास फोटो

Bigg Boss 15 | Khatron Ke Khiladi 11 नंतर अर्जुन बिजलानी सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार?