Bigg Boss 15 | Khatron Ke Khiladi 11 नंतर अर्जुन बिजलानी सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 30, 2021 | 11:59 AM

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) नुकताच कलर्स टीव्हीचा अ‍ॅडव्हेंचर रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’चे शूट पूर्ण करून केप टाऊनहून मुंबईत परतला आहे. स्पॉटबॉय या ऑनलाइन पोर्टलच्या रिपोर्टनुसार लवकरच अर्जुन बिजलानी आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये सामील होणार आहे.

Bigg Boss 15 | Khatron Ke Khiladi 11 नंतर अर्जुन बिजलानी सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार?
अर्जुन बिजलानी-सलमान खान

Follow us on

मुंबई : टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) नुकताच कलर्स टीव्हीचा अ‍ॅडव्हेंचर रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’चे शूट पूर्ण करून केप टाऊनहून मुंबईत परतला आहे. स्पॉटबॉय या ऑनलाइन पोर्टलच्या रिपोर्टनुसार लवकरच अर्जुन बिजलानी आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये सामील होणार आहे. त्यांच्या अहवालानुसार ‘नागीन’ फेम हा अभिनेता लवकरच कलर्स टीव्हीचा वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 15’ मध्ये (Bigg Boss 15 ) दिसणार आहे. ‘खतरों के खिलाडी 11’च्या 40 दिवसांच्या शेड्यूलच्या शूटिंगनंतर सध्या भारतात परतलेला अर्जुन लवकरच कनिका मान यांच्यासोबत त्याच्या नवीन वेब सीरीजच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे (Bigg Boss 15 latest update Actor Arjun Bijlani open up about new reality show entry).

मात्र, जेव्हा अर्जुन बिजलानी याला जेव्हा ‘बिग बॉस’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी व्हायला आवडेल का?, असे विचारले असता अर्जुन बिजलानी म्हणाला होता की, “मी बिग बॉसचा भाग होणार की, नाही हे मला माहिती नाही. मी आत्तापर्यंत याबद्दल काहीही विचार केलेला नाही. खरे सांगायचे तर मला काहीतरी वेगळे करायचे आहे. पण असे म्हणतात की ‘नेव्हर से नेवरर’ (कधीही कोणतीही गोष्ट नाकारू नका.) जेव्हा मला हा शो ऑफर केला जाईल, तेव्हा मला हा शो करायचा आहे की नाही याबद्दल मी विचार करेन.’

यावेळी बिग बॉसचा सीझन असेल वेगळा!

कलर्स टीव्हीचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 15’ मध्ये यावर्षी सेलिब्रिटी तसेच सामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार यंदाचा बिग बॉस सीझन सहा महिन्यांसाठी चालेल. तथापि, चॅनेलकडून याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. असं म्हटलं जात आहे की, यंदा प्रत्येक स्पर्धकाला बेदखल झाल्यानंतर वाईल्ड कार्डनी प्रवेशाची संधी दिली जाईल. यावर्षी ‘बिग बॉस 15’ मध्ये रिया चक्रवर्ती, निया शर्मा, कृष्णा अभिषेक, दिशा वाकानी, मोहसीन खान यासारख्या बड्या नावांचा समवेश होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

राखी सावंत आणि बिंदू दारा सिंह यांना पुन्हा शोमध्ये सहभागी व्हायचंय!

गेल्या सीझनमध्ये राखी सावंतचे आगमन झाल्यामुळे शोमध्ये मोठा ट्विस्ट आला होता आणि शोचे रेटिंगही वाढले होते. यावेळीही ही कॉन्ट्रोवर्सी क्वीन सर्वात मोठ्या कॉन्ट्रोवर्सी शोमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहे. राखीबरोबरच बिंदू दारा सिंगनेही असे म्हटले आहे की, जर त्याला बिग बॉससाठी कॉल आला, तर तो या शोचा पुन्हा एक भाग होण्यासाठी तयार आहे.

(Bigg Boss 15 latest update Actor Arjun Bijlani open up about new reality show entry)

हेही वाचा :

Photo : अभिनयाने सुरुवात, चित्रपट दिग्दर्शनही, मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांची फिल्मी कारकीर्द

Devmanus | कोरोना, लॉकडाऊन, चित्रीकरण अन् कोर्टातच झालं ‘डिंपल’च्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI