Indian idol 12 | ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर पवनदीपने दिली प्रेमाची कबुली, चाहत्यांना अरुणिताच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा!

पवनदीप आणि अरुणिता या जोडीच्या चाहत्यांसाठीही आगामी एपिसोड बऱ्यापैकी मनोरंजक ठरणार आहे. वास्तविक, अरुणिताच्या फॅन क्लबने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या सादरीकरणानंतर ‘प्यार के पकोडे’ बनवताना दिसली आहे.

Indian idol 12 | ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर पवनदीपने दिली प्रेमाची कबुली, चाहत्यांना अरुणिताच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा!
पवनदीप-अरुणिता

मुंबई : इंडियन आयडॉलचा हा 12वा सीझन (Indian Idol 12) खूप चर्चेत आला आहे. या सीझनमधील स्पर्धक पवनदीप राजन असोत वा अरुणिता किंवा षण्मुखप्रिया सगळेच खूप चर्चेत आहेत. आता शोच्या आगामी भागात बॉलिवूडचे पावर कपल शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा येणार आहेत. त्याशिवाय पवनदीप आणि अरुणिता या जोडीच्या चाहत्यांसाठीही आगामी एपिसोड बऱ्यापैकी मनोरंजक ठरणार आहे. वास्तविक, अरुणिताच्या फॅन क्लबने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या सादरीकरणानंतर ‘प्यार के पकोडे’ बनवताना दिसली आहे (Pawandeep Rajan confess his love on Indian Idol 12 stage).

या व्हिडीओमध्ये परीक्षक अनु मलिक म्हणतात की, अरुणिता तू पकोडे बनवशील आणि हिमेश ते खाईल. यानंतर, अरुणिता प्रत्येकासाठी पकोडे आणते आणि अनु, हिमेश आणि सोनू कक्कर खातात. त्यानंतर आदित्य नारायण पवनदीपला स्वत:च्या हातांनी ते पकोडे खायला देतो.

यानंतर पवनदीप म्हणतो, जेव्हा जेव्हा हा पावसाळा येतो तेव्हा ती नवीन काहीतरी आणतो. मला वाटतंय मी प्रेमात पडलोय. त्याचे वक्तव्य ऐकल्यानंतर सर्व स्पर्धकांसह तिन्ही न्यायाधीशांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता पवनदीपच्या या प्रेमाच्या कबुलीवर अरुणिताची प्रतिक्रिया काय असेल, हे आगामी भागांतून कळेल.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by officialfanpage (@idolarunitafc)

तसे, दोघांचेही बॉन्डिंग पाहून आणि शोमधील दोघांची केमिस्ट्रीनंतर प्रत्येकाला वाटतं की, पवनदीप आणि अरुणिता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार आहेत. पण हे सर्व केवळ मनोरंजनासाठी घडत असल्याचे आदित्य नारायण यांनी स्पष्टीकरण दिले होते. आदित्य म्हणाला होता, ‘हे सर्व फक्त एक नाटक आहे. आता हा शो 90 मिनिटांचा असल्याने, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्हाला हे सर्व करावे लागते.’

आदित्य पुढे म्हणाला की, ‘असं असलं तरी, या दोघांनाही यात काहीच अडचण नाही आणि हे माहित नाही की या गंमती-विनोदात दोघांमध्ये खरोखर काही घडलं आहे का? आणि जरी ते घडलं नाही, तरीसुद्धा दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही ते आपापल्या आयुष्यात नेहमी पुढे जातील!’

प्रेक्षक संतापले

आदित्यच्या टिप्पणीनंतर निर्मात्यांनी टीआरपीसाठी खोटी लव्ह स्टोरी दाखवल्याबद्दल चाहते प्रचंड चिडले होते. यापूर्वी आदित्य आणि नेहा कक्कर यांच्या लग्नाचा ड्रामा या शोमध्ये दाखवला होता. इतकेच नाही तर त्या काळात त्या दोघांच्या लग्नाच्या विधी प्रत्येक भागातून दाखवण्यात आला आणि नंतर पुन्हा आदित्यने हे स्पष्ट केले होते की, हे सर्व फक्त टीआरपीसाठी केले गेले होते.

(Pawandeep Rajan confess his love on Indian Idol 12 stage)

हेही वाचा :

Photo : निळ्या साडीत दिसला मोनालिसाचा कातिलाना अंदाज, फोटो पाहाच…

Rhea Chakraborty : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर रिया चक्रवर्तीनं शेअर केला स्वत:चा हसरा फोटो, म्हणाली…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI