अभिनव शुक्लासोबत ‘वन नाईट स्टँड’चा आरोप, अभिनेत्री सोफिया हयात म्हणते…

'बिग बॉस' सारख्या वादग्रस्त रिअॅलिटी शोचा भाग असणारी अभिनेत्री सोफिया हयात (Sofia Hayat) सध्या बरीच ट्रोल होत आहे. ट्रोल होण्याचे कारण म्हणजे तिच्यावर टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) याच्यासोबत लैंगिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अभिनव शुक्लासोबत ‘वन नाईट स्टँड’चा आरोप, अभिनेत्री सोफिया हयात म्हणते...
सोफिया-अभिनव

मुंबई : ‘बिग बॉस’ सारख्या वादग्रस्त रिअॅलिटी शोचा भाग असणारी अभिनेत्री सोफिया हयात (Sofia Hayat) सध्या बरीच ट्रोल होत आहे. ट्रोल होण्याचे कारण म्हणजे तिच्यावर टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) याच्यासोबत लैंगिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोफियाने हे वृत्त पूर्णपणे नाकारले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोफियाने ट्रोलरशी झालेले तिचे संभाषण शेअर केले आहे. ही पोस्ट शेअर करताना सोफिया म्हणाली की, या व्यक्तीने तिच्याकडे मदत मागितली होती, परंतु सोफियाला तिचा हेतू शंकास्पद वाटल्यामुळे तिने हे अकाऊंट ब्लॉक केले आहे (Sofia Hayat talks about relationship with Actor Abhinav Shukla).

सोफियाच्या म्हणण्यानुसार हा ट्रोलर मुलगा नसून एक मुलगी आहे. यानंतर या मुलीने दुसरे एक खाते तयार केले आणि त्यावरून सोफियाला धमकावले. इतकेच नाही तर तिच्यासाठी अवमानकारक शब्दांचा वापर केला. याशिवाय सोफियाने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.  या व्हिडीओमध्ये तिने रुबीना दिलैक हिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला यांच्याशी तिच्या संबंधांचे सत्य सांगितले.

सोफियाने ट्रोलरला सुनावले खडे बोल

व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी सोफियाने एक पोस्ट शेअर केली आहे. सोफियाने लिहिले- “ती माझी चूक होती. मी सहसा माझे डीएम तपासत नाही, परंतु जेव्हा तो म्हणाला की त्याला मदतीची आवश्यकता आहे, तेव्हा मी मेसेज पाहिले. काही मिनिटांनंतर मला समजले की, तो खोटं बोलत आहे. मी त्याला रोखले. त्यानंतर त्याने दुसरे खाते तयार केले आणि मला हे संदेश पाठवले. ”

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

सोफियाने सांगितले सत्य

या पोस्टनंतर, सोफियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘अभिनव शुक्लाशी माझे संबंध… ‘ यापुढे ती व्हिडीओत म्हणाली की, ‘अभिनव शुक्ल कोण आहे, ही मला आता गुगल सर्च केल्यावर कळले. माझे त्याच्याशी कधीच संबंध नव्हते. मी त्याला ओळखतच नाही. मी कधीच त्याच्यासोबत डेटवर गेलेले नाही किंवा त्याच्याबरोबर काम देखील केले नाही. जे लोक माझ्या चारित्र्याबाबत प्रश्न विचारत आहेत आणि खोटी अफवा पसरवत आहेत, त्यांना वास्तव तपासणीची आवश्यकता आहे. जर ही मूर्ख विधाने आताच थांबवली गेली नाहीत, तर मला कायदेशीर मदत घ्यावी लागेल.’

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

(Sofia Hayat talks about relationship with Actor Abhinav Shukla)

हेही वाचा :

Photo : ‘दिव्य दृष्टि’ फेम अभिनेत्री सना सय्यद आणि इमाद शम्सीचा निकाह, सोशल मीडियावर फोटो शेअर

Salman Khan | सिनेवर्कर्सच्या मदतीसाठी सलमान खान पुन्हा पुढे सरसावला, आर्थिक मदतीत उचलला खारीचा वाटा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI