Rhea Chakraborty : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर रिया चक्रवर्तीनं शेअर केला स्वत:चा हसरा फोटो, म्हणाली…

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हळूहळू सोशल मीडियावर कमबॅक करत आहे. रिया सध्या पुन्हा इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. (Rhea Chakraborty: A year after Sushant Singh Rajput's death, Rhea Chakraborty shared a photo of herself smiling, said)

Rhea Chakraborty : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर रिया चक्रवर्तीनं शेअर केला स्वत:चा हसरा फोटो, म्हणाली…

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला एक वर्ष पूर्ण झालं असून आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हळूहळू सोशल मीडियावर कमबॅक करत आहे. रिया सध्या पुन्हा इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतंच रियानं तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

सध्या रिया स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतेय, याचा पुरावा ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही देत ​​आहे. आता रियानं स्वत:चा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

रियाने शेअर केला फोटो

सुशांतसिंह राजपूतचं निधन झाल्याच्या एका वर्षानंतर तिनं आपला पहिला हसरा फोटो शेअर केला आहे. सुशांतच्या निधनानंतर रियानं तिचे कोणतेही हसरे फोटो शेअर केले नव्हते. आता प्रथमच रिया चक्रवर्तीनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय.

रियानं सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये रियाचे केस उडताना दिसत आहेत, सोबतच ती ब्लॅक कलरच्या टॉपमध्ये दिसत आहे. सोबतच फोटो शेअर करत रियानं लिहिलं आहे की उठा आणि चमका…

रिया चक्रवर्तीचा हा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रियाच्या फोटोवर चाहत्यांची वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहे. नुकतंच रियानं तिच्या बालपणीचा एक फोटोही शेअर केला आहे.

रिया ठरली टाइम्सची मोस्ट डिझायरेबल वुमन 2020

नुकतंच रिया चक्रवर्तीची टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 म्हणून निवड झाली आहे. या यादीमध्ये सामील झालेल्या रियानं अनेक मोठ्या अभिनेत्रींनाही मागं टाकलं आहे. रिया चक्रवर्तीनं दीपिका पादुकोण, आलिया भट्ट यांना मागे टाकलं असून हा मान मिळवला आहे. यामुळे रियाच्या प्रतिमेमध्ये मोठा फरक पडला आहे. कारण सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर रियाची प्रतिमा सर्वत्र खराब झाली. सुशांत प्रकरणात रियाला ड्रग्स अँगलमध्ये अटक करण्यात आली होती, एवढंच नाही तर तिलाही एका महिन्यासाठी तुरूंगात डांबलं गेलं होतं.

संबंधित बातम्या

Photo : निळ्या साडीत दिसला मोनालिसाचा कातिलाना अंदाज, फोटो पाहाच…

‘जज अनेक पण हातवारे एक…’, सारेगमपचे ‘पंचरत्न’ परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल

Video | डोक्यावर केक घेऊन राखी सावंतचा डान्स, नवं टॅलेंट पाहून चाहते म्हणतायत ‘वन्स मोअर’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI