सध्या ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका खूप चर्चेत आली आहे. मालिकेचं दमदार कथानक आणि सतत येणारे ट्वीस्ट यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. नुकताच या मालिकेतील ‘डिंपल’ अर्थात अभिनेत्री अस्मिता देशमुख (Asmeeta Deshmukh) हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Jun 30, 2021 | 11:37 AM

1 / 5
कोरोना, लॉकडाऊन आणि चित्रीकरण सुरु असल्याने अस्मिताच वाढदिवस ‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवरच साजरा करण्यात आला.
2 / 5
मालिकेत सध्या कोर्टाचा सिक्वेन्स सुरु आहे. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवी सिंग याला शिक्षा देण्यासाठी एसीपी दिव्या आणि वकील आर्या दोघींनीही कंबर कसली आहे.
3 / 5
सध्या देवी सिंगला कोर्टात हजार करण्यात येत असून, त्याच्यावर केस सुरु झाली आहे. म्हणूनच मालिकेत आता कोर्टाचा सेट पाहायला मिळतो आहे.
4 / 5
दरम्यान ‘डिंपल’ अर्थात अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्या वाढदिवसानिमित्ताने सेटवर छोटेखानी सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं. कोर्टाच्या सेटअप असलेल्या या सेटवरच तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ‘देवमाणूस’च्या संपूर्ण टीमने खास केक्स देखील आणले होते.