Sarsenapati Hambirrao | ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट!’, ‘सरसेनापती हंबीरराव’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत आज (18 डिसेंबर) ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या जबरदस्त टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

Sarsenapati Hambirrao | ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट!’, ‘सरसेनापती हंबीरराव’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
Sarsenapati Hambirrao
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 1:14 PM

मुंबई : ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत आज (18 डिसेंबर) ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या जबरदस्त टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

या जबरदस्त टीझरमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान उलगडताना दिसत आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका सकारात असून, त्याच्या दमदार अभिनयाने हा टीझर आणखीनच धमाकेदार वाटत आहे.

पाहा टीझर :

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफीसवर दणदणीत यश संपादन केलं होतं. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

गश्मिर महाजनी साकारणार मुख्य भूमिका

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला होता. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे देखील आता समोर आले आहेत. आता अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्याबद्दलचे मोठे औत्सुक्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या