83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

कपिल देवची भूमिका रणवीर सिंहनं (Ranveer Singh) केलीय. तर, कपिल देवची पत्नी रोमी भाटियाची भूमिका दिपीका पादूकोण (Deepika Padukone) हिनं केली आहे. हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये ही फिल्म प्रदर्शित होणार आहे.

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर,  83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी
83 चित्रपटाचं पोस्टर
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:51 AM

नवी दिल्ली: टीम इंडियानं (Team India) पहिल्यांदा 1983 मध्ये एकदिवसीय सामन्यामधील विश्वचषक कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्त्वात जिंकला होता. ते क्षण भारतीय चित्रपट रसिकांना पडद्यावर 83 चित्रपटाच्या ( 83 Film) निमित्तानं पाहता येणार आहेत. कबीर खाननं (Kabir Khan)दिग्दर्शित केलेला 83 चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे. याप्रूर्वी हा चित्रपट कोरोना संसर्गामुळं प्रदर्शित झालेला नव्हता. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी काही खास व्यक्तींना 83 फिल्म दाखवण्यात आली आहे. त्या लोकांनी कबीर खाननं मास्टरपीस तयार केल्याचं म्हटलंय.

83 चा पहिलं समीक्षण समोर, कौतुकांचा वर्षाव

दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिनं इंस्टाग्रामवर काही लोकांचं चित्रपटाविषयी असणारं मत स्टेटस म्हणून शेअर केलं आहे. त्यामध्ये त्या लोकांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय. 83 चित्रपटाबद्दल आणि रणवीवर सिंगनं केलेल्या कामाबद्दल लोकांचं आकर्षण देखील हळू हळू वाढत असताना दिसतंय. काही लोकांनी हा याला मास्टरपीस म्हटलंय. तर, काही लोकांनी फिल्म पाहताना शहारे आल्याचं म्हटलंय. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत सर्व गोष्टींचं कौतुक करण्यात आलंय.

83 मास्टरपीस, प्रेरणादायी, कबीर खानला धन्यवाद

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट पाहिलेल्या एखा व्यक्तीनं त्याचं मत व्यक्त केलं आहे. काय चित्रपट आहे. फिल्ममध्ये हास्य, गंभीरता, हुटिंग आणि चिअर्स हे सर्व पाहायला मिळतंय, असं त्यानं म्हटलंय. धन्यवाद कबीर खान असं एका व्यक्तीनं म्हटलंय. दुसऱ्या व्यक्तीनं आता या फिल्मला कोणी रोखू शकत नाही. बॉल पार्कमधून बाहेर गेलेला आहे. मी फिल्म दोन वेळा पाहिलीय. मला अजून एकदा चित्रपट पाहायचाय आता वाट पाहू शकत नाही, असं म्हटलंय. एका व्यक्तीं 83 चित्रपटाला मास्टरपीस म्हणत अंगावर शहारे आल्याचा फोटो देखील पोस्ट केलाय.

83 चित्रपटाबद्दल इतकं सर्व काही वाचल्यानंतर कुणालाही हा चित्रपट पाहण्याची इच्छा होईल. 83 फिल्ममधील अभिनेत्यांकडून सर्वत्र जोरदार प्रमोशन सुरु आहे. भारतीय लोक 1983 चे विश्वचषकातील ते दिवस पुन्हा एकदा अनुभवणार आहेत. या चित्रपटात कपिल देवची भूमिका रणवीर सिंहनं (Ranveer Singh) केलीय. तर, कपिल देवची पत्नी रोमी भाटियाची भूमिका दिपीका पादूकोण (Deepika Padukone) हिनं केली आहे. हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये ही फिल्म प्रदर्शित होणार आहे.

इतर बातम्या:

1983 world cup | क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी सांगितले ‘तो’ किस्सा सांगितला, ज्यामुळे जागाच्या इतिहासात भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं , पाहा व्हिडिओ

’83’ Movie | कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी केली शेअर

ranveer singh most awaited film 83 first movie review released fans said it is masterpiece and motivational

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.