Video | नारंगी साडीतील शालूचा काळ्या रानात जलवा; चाहते म्हणतायत ‘हळू चाल काटा रुतेल गं…’

राजेश्वरी खरात तिच्या फोटोमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने नारंगी साडीमध्ये थेट आपल्या शेतातून एक व्हिडीओ अपलोड केला आहे. (rajeshwari kharat video beautiful saree)

Video | नारंगी साडीतील शालूचा काळ्या रानात जलवा; चाहते म्हणतायत 'हळू चाल काटा रुतेल गं...'
Rajeshwari-Kharat
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 10:43 PM

मुंबई : सिनेक्षेत्रात अशा काही नट्या असतात ज्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते चातकासारखी वाट पाहतात. आपल्या पहिल्याच ‘फँड्री’ या चित्रपटानंतर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात  (Rajeshwari Kharat) ही त्यापैकीच एक. राजेश्वरी खरात ही वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने फेसबूक, इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. तिच्या या फोटोंची तरुणांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली असते. मात्र, सध्या राजेश्वरी खरात तिच्या फोटोमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने नारंगी साडीमध्ये थेट आपल्या शेतातून एक व्हिडीओ अपलोड केला आहे. (Rajeshwari Kharat uploaded video on Social Media looking beautiful in Orange saree)

नारंगी रंगाच्या साडीत शालूचा जलवा

मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात तरुण कलाकारांपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणून राजेश्वरी खरातची ओळख आहे. तिने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोला काही क्षणांत हजारोंनी लाईक्स असतात. मात्र राजेश्वरीने यावेळी फोटो नाही तर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्येसुद्धा राजेश्वरी अतिशय गोड दिसत आहे. भरदार अशा नारंगी साडीमध्ये ती तिच्या शेतात आहे. वाऱ्यावर उडणारा पदर, हवेसोबत खेळणारे तिचे केस तिच्या सौदंर्यात अणखीणच भर घालतायत. नारंगी साडीतील तिचा हा जलवा नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

‘गावाकडे शेतात छान वाटतं, मस्त वाटतं’

राजेश्वरी खरात सध्या विदर्भात आपल्या घरी आहे. ती सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. यावेळी तिने विदर्भातील तिच्या शेतातून एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये ती सध्या तिच्या शेतात असल्याचं ती सांगते. तसेच, गावाकडे आल्यानंतर सगळं शांत असतं. येथे खूप छान वाटतं; असं ती आवर्जून सांगतेय. तसेच गावाकडची मज्जा काही वेगळीच असून सध्या अत्यंत खुश असल्याचं राजेश्वरी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

पाहा व्हिडओ :

शालूला आजोबांची आठवण

प्रत्येकालाच लहाणपणी आपल्या आजी-आजोबांचं भरपूर प्रमे मिळालेलं असतं. आजी-आजोबांशी असलेले भावबंध कित्येकजण ते हयात असेपर्यंत जपतात. या व्हिडीओमध्ये शालू म्हणजेच राजेश्वरी खऱातसुद्धा आपल्या आजोबांची आठवण सांगत आहे. “आजोबा जेव्हा हयात होते; तेव्हा एके काळी मी शेतात आले होते. त्यानंतर आज बर्‍याच काळानंतर मी येथे गावी आली आहे. शेतात फिरल्याने आजोबांसोबतच्या बर्‍याच आठवणी जागी झाल्या आहेत,” असं तिने व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहलं आहे.

भन्नाट कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, राजेश्वरीने हा व्हिडीओ अपलोड करताच तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने तर हळू चाल गं….. पायात काटा रुतेल ना, अशी मजेदार कमेंट केली आहे. राजेश्वरीचा हा व्हिडीओ तिच्या फोटोंप्रमाणेच चांगलाच लाईक आणि शेअर केला जातोय.

इतर बातम्या :

Photo : अभिनेत्री अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटिफूल फोटो

Nidhhi Agerwal | अभिनेत्री निधी अगरवालचे सिझलिंग फोटोशूट

कोरोनामुळे चित्रीकरण बंद, बॉलिवूडकर बाहेरगावी फिरायला, तर त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेला!

(Rajeshwari Kharat uploaded video on Social Media looking beautiful in Orange saree)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.