Rada: ‘राडा’ सिनेमाच्या मोशन पोस्टरची चर्चा; ॲक्शनपटला मिळालाय साऊथ स्टाईल टच

या चित्रपटाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. मोशन पोस्टर आणि पोस्टरवरील त्याचा स्टनिंग लूक चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. आकाश पहिल्यांदाच ॲक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Rada: राडा सिनेमाच्या मोशन पोस्टरची चर्चा; ॲक्शनपटला मिळालाय साऊथ स्टाईल टच
Rada: 'राडा' सिनेमाच्या मोशन पोस्टरची चर्चा
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 12:55 PM

साऊथ स्टाईल कमालीची ॲक्शन आणि तरुणाईला भुरळ पाडणारा हँडसम हंक ‘राडा’ (Rada) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फुल्ल ऑफ ॲक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चांगलीच हवा करत आहे. सोबत या चित्रपटाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार (Akash Shetty Tuptewar) ‘राडा’ या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. मोशन पोस्टर (Motion Poster) आणि पोस्टरवरील त्याचा स्टनिंग लूक चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. आकाश पहिल्यांदाच ॲक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ सिनेमाचे पोस्टर पाहता ते एकदम रफ अँड टफ असून रुबाबदार आणि डॅशिंग शरीरयष्टी असलेला एक हँडसम हंक दिसत असून त्याच्या समोर आलेल्या वादळांना आणि संकटाना तो सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे त्याच्या शैलीवरून दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील क्रोधाच्या खुणा या कोणाला तरी योग्य तो न्याय देण्याच्या प्रयत्नात असल्याचे जाणवत आहेत. आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, त्याचा हा राग नेमका कोणाला धडा शिकवण्यासाठी आहे हे सिनेमा पाहिल्यावरच कळू शकेल. रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांचा हा भव्यदिव्य ॲक्शनपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस आणणार आहेत.

दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा सांभाळल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा सिनेमा के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या ॲक्शनपटात आता आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल. येत्या 23 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.