Masaba Gupta | वडील विवियन रिचर्ड्ससमोर मसाबा गुप्ताने केलं लिपलॉक; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

लग्नानंतर मसाबाने रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Masaba Gupta | वडील विवियन रिचर्ड्ससमोर मसाबा गुप्ताने केलं लिपलॉक; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
मसाबा गुप्ताच्या लग्नाच्या पार्टीतील व्हिडीओ व्हायरल; विवियन रिचर्ड्ससमोर केलं किस
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2023 | 3:18 PM

मुंबई: प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता नुकतीच विवाहबंधनात अडकली. मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत मसाबाने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये आई नीना गुप्ता आणि वडील विवियन रिचर्ड्स एकाच फ्रेममध्ये दिसले. लग्नानंतर मसाबाने रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मसाबा आणि सत्यदीपच्या या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री सोनम कपूर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा यांच्यासह विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्तादेखील सहभागी झाल्या होत्या.

या पार्टीत केक कापताना मसाबा आणि सत्यदीपने लिपलॉप केलं. आधी दोघांनी एकमेकांना केक भरवला आणि त्यानंतर किस केलं. यावेळी दोघांच्या मागे विवियन रिचर्ड्स उभे होते. तर उपस्थित असलेले पाहुणे टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होते.

मसाबाच्या या लिपलॉप व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘एक वेळ अशी होती तेव्हा वडिलांच्या आज्ञेनंतर श्रीरामजी 14 वर्षांच्या वनवासात गेले आणि आजच्या काळात आईवडिलांसमोरच हे सर्व होताना दिसतंय. यालाच कलयुग म्हणतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘अंग्रेज चले गए इनको छोड गए’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘इतकंही मॉडर्न बनू नका, थोडीतरी लाज बाळगा’, अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी टोला लगावला आहे.

मसाबा ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

सत्यदीप आणि मसाबा हे ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये एकत्र दिसले होते. मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी सत्यदीपने वकील म्हणून काम केलं. त्याने बॉम्बे वेल्वेट, नो वन किल्ड जेसिका, फोबिया आणि विक्रम वेधा यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.