MC Stan | सानिया मिर्झाकडून एमसी स्टॅनला लाखोंचे गिफ्ट्स; रॅपर म्हणाला ‘तेरा घर जाएगा इसमें’

शूज आणि गॉगल्सचा फोटो पोस्ट करत त्याने सानिया मिर्झाचे आभार मानले. या पोस्टमध्ये त्याने सानियाचा उल्लेख 'आपा' असं केलं आहे. 'तेरा घर जाएंगा इसमें' असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

MC Stan | सानिया मिर्झाकडून एमसी स्टॅनला लाखोंचे गिफ्ट्स; रॅपर म्हणाला तेरा घर जाएगा इसमें
MC Stan and Sania Mirza
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2023 | 10:16 AM

मुंबई : बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर रॅपर एमसी स्टॅनची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने त्याच्या कॉन्सर्ट्सची घोषणा केली. देशातील विविध शहरांमध्ये तो कॉन्सर्ट करत आहे. विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनला अनेकांकडून महागडे गिफ्ट्स मिळाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही स्टॅनला भेटवस्तू दिल्या आहेत. अशातच त्याला नुकतंच एका खास व्यक्तीकडून अत्यंत महाग भेटवस्तू मिळाली आहे. या गिफ्ट्सचा फोटो त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. स्टॅनला गिफ्ट देणारी ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून टेनिसपटू सानिया मिर्झा आहे. सानियाकडून भेट मिळाल्यानंतर स्टॅननेही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.

सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला दिलेल्या या गिफ्ट बॉक्समध्ये शूज आणि गॉगल्स पहायला मिळत आहेत. या दोन्हींची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. सानियाने एमसी स्टॅनला दिलेल्या शूजची किंमत जवळपास 91 हजार रुपये आहे. तर गॉगल्स जवळपास 30 हजार रुपयांचे आहेत. खुद्द स्टॅननची याबद्दलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

शूज आणि गॉगल्सचा फोटो पोस्ट करत त्याने सानिया मिर्झाचे आभार मानले. या पोस्टमध्ये त्याने सानियाचा उल्लेख ‘आपा’ असं केलं आहे. ‘तेरा घर जाएंगा इसमें’ असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एमसी स्टॅनने फराह खानच्या पार्टीत सानियाची भेट घेतली होती. त्यावेळी स्टॅनवर सानिया खूप प्रभावित झाली होती. म्हणूनच तिने त्याच्यासाठी महागडे भेटवस्तू पाठवले.

एमसी स्टॅनची पोस्ट

एमसी स्टॅन आणि अब्दुचा वाद

बिग बॉसचा शो संपल्यानंतर एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिक यांचा वादही चर्चेत आला. अब्दुने एमसी स्टॅनच्या शोला हजेरी लावून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा त्याच्या मॅनेजरकडे व्यक्त केली होती. मात्र अब्दुने शोच्या ठिकाणी राहू नये, अशी स्टॅनची इच्छा असल्याचं सेक्युरिटी टीम आणि आयोजकांनी सांगितलं. स्टॅनच्या टीमकडून काहीतरी गैरसमज झाला असावा असं समजून अब्दु त्याठिकाणी सामान्य पाहुण्याप्रमाणे तिकिट विकत घेऊन गेला होता. मात्र एमसी स्टॅनच्या मॅनेजमेंट टीमकडून अब्दुला अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्यांनी अपशब्द वापरले आणि अब्दुच्या कारचंही नुकसान केलं, असा आरोप सोशल मीडियावरील पोस्टद्वारे करण्यात आला होता. ही पोस्ट अब्दुच्या टीमकडून पोस्ट करण्यात आली होती.