ब्राझीलच्या मॉडेलला अश्लील फोटो पाठवले, मिका सिंगला बेड्या

मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप मिका सिंगवर आहे. मिका सिंग कॉन्सर्टसाठी दुबईला गेला होता, तिथे त्याला बुधवारी रात्री तीनच्या सुमारास दुबई पोलिसांनी अटक केली. त्याला मुरक्काबात पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. पोलिस मिकाची कसून चौकशी करत असून, रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले …

ब्राझीलच्या मॉडेलला अश्लील फोटो पाठवले, मिका सिंगला बेड्या

मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप मिका सिंगवर आहे. मिका सिंग कॉन्सर्टसाठी दुबईला गेला होता, तिथे त्याला बुधवारी रात्री तीनच्या सुमारास दुबई पोलिसांनी अटक केली. त्याला मुरक्काबात पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. पोलिस मिकाची कसून चौकशी करत असून, रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते.

मिका मला अश्लील फोटो पाठवायचा, असा आरोप ब्राझीलच्या मॉडेलने केला आहे. मिकाचे मित्र सध्या त्याला सोडवण्याच्या प्रयत्न करत आहेत.

याआधीही मिका वादात!

मिकासाठी हा वाद काही नवीन नाही, 2006 साली मिकाने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत जबरदस्तीने किस केल्याचा आरोप राखी सावंतले केला होता. ज्यानंतर हा वाद खूप गाजला. मात्र काही वर्षांनी राखीने या वादावर पडदा टाकला. तर 2016 मध्ये एका मॉडेलने मिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, ज्यावर मिकाने त्या मॉडेल विरोधात खंडणीखोरीची तक्रार दाखल केली होता.

याच वर्षी मार्च महिन्यात पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मिकाचा मोठा भाऊ दलेर मेहेंदी याला मानवी तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांचा कारावास ठोठवला होता. मात्र काहीच दिवसांनी त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *