तीन महिने नवरा बायकोप्रमाणे एकत्र राहिले, मिथुन चक्रवर्ती यांचे आधीच लग्न तरीही प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत..

Mithun Chakraborty Sridevi Affair Clim : बॉलिवूडमधील अफेअर्स काही नवीन विषय नाही. 80 च्या दशकातील अफेअर सर्वात जास्त गाजलेली आहेत. त्यामध्येच त्यावेळीचे प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्री चक्क पती पत्नीसारखे राहत होते.

तीन महिने नवरा बायकोप्रमाणे एकत्र राहिले, मिथुन चक्रवर्ती यांचे आधीच लग्न तरीही प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत..
Mithun Chakraborty
| Updated on: Aug 07, 2026 | 12:39 PM

बॉलिवूडमधील अफेअर्स काही नवीन गोष्ट नाही. अमिताभ बच्चन रेखा यांच्यासोबतच श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांचेही अफेअर चर्चेत राहिले. यादरम्यानच धक्कादायक म्हणजे तब्बल तीन महिने मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी पती पत्नीसारखे एकत्रच राहत होते. मिथून चक्रवर्ती यांचे लग्नही त्यावेळी झाले होते. ऐंशीच्या दशकातील हे सर्वात चर्चेत असलेले अफेअर होते. जाग उठा इंसान चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघे पती पत्नीसारखे तीन महिने एकत्र राहिले. सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ज्योती व्यंकटेश यांनी म्हटले की, मिथुन चक्रवर्ती यांची आऊटडोअर शूटिंग सुरू होते. त्यावेळी श्रीदेवी या त्यांच्यासोबतच होत्या. श्रीदेवी कधी सेटवर गेल्या नाहीत, पण त्या रूमध्येच राहत होत्या. शूटिंगमध्ये ब्रेक मिळाली की, मिथुन चक्रवर्ती त्यांच्या रूमध्ये जात.

दोघे एकत्रच पती पत्नीसारखी तीन महिने राहिले. ज्योती व्यंकटेश यांनी म्हटले की, यादरम्यान मी मिथुन चक्रवर्ती यांना भेटले. मी त्यांना मजाकमध्ये विचारले की, तुम्ही आतापर्यंत तामिळ बोलायला शिकला असताल ना.. मी त्यांना हे तामिळमध्ये विचारले. यावर ते गप्प राहिले आणि त्यांनी माझ्यासोबत तामिळमध्ये बोलण्यास नकार दिला. ते काहीच बोलले नाही.

मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांचे नाते जास्त काळ टिकणार नव्हते, हे जवळपास लोकांना माहितीच होते. कारण श्रीदेवी त्यावेळी खूप मोठ्या अभिनेत्री होत्या. त्या दोघांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. अनेकांनी यांच्या अफेअरच्या चर्चा खोट्या असल्याचाही अंदाज लावला. ज्यावेळी मिथुन चक्रवर्ती श्रीदेवी यांच्यासोबत पतीसारखे राहत होते, त्यावेळी मिथुन चक्रवर्ती यांचे अगोदरच योगिता बाली यांच्यासोबत लग्न झाले होते.

हे लग्न फार काळ टिकणार नसल्याचा अनेकांचा अंदाज होता. मात्र, श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांचेच नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे योगिता बाली यांच्याकडे पुन्हा मिथुन चक्रवर्ती गेले. मिथून चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांचे अफेअर त्यावेळी खूप मोठा चर्चेचा विषय होता. मात्र, त्यावर दोघांनीही कधी भाष्य केले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us