AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेन स्ट्रोकनंतर मिथुन चक्रवर्ती थेट निघाले सुट्टीवर, सून आणि मुलासोबतचा ‘तो’ फोटो..

मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मिथुन चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मिथुन चक्रवर्ती हे काही दिवसांपूर्वीच रूग्णालयात उपचार घेताना दिसले. मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.

ब्रेन स्ट्रोकनंतर मिथुन चक्रवर्ती थेट निघाले सुट्टीवर, सून आणि मुलासोबतचा 'तो' फोटो..
| Updated on: Mar 06, 2024 | 6:44 PM
Share

मुंबई : बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात 10 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळाल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. सुरूवातीला मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले की, हेल्थ चेकअपसाठी ते रूग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यानंतर हे स्पष्ट झाले की, मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. काही दिवस रूग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांनी उपचार देखील घेतले.

मिथुन चक्रवर्ती यांच्या हेल्थ अपडेटकडे सर्वांच्या नजरा दिसल्या. काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलीये. आता थेट लेक आणि सुनेसोबत मिथुन चक्रवर्ती हे सुट्टीवर जाताना दिसत आहेत. मिथुन चक्रवर्ती, लेक मिमोह चक्रवर्ती आणि सून मदालसा शर्मा यांच्यावर सुट्टीवर निघाले आहेत. याचा एक फोटोही व्हायरल होतोय.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये मिथुन चक्रवर्ती, मदालसा शर्मा आणि मिमोह चक्रवर्ती हे दिसत आहेत. हा फोटो विमानामधील आहे. या फोटोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी तोंडाला मास्क लावल्याचे देखील बघायला मिळतंय. मिथुन चक्रवर्ती यांना परत एकदा असे ठणठणीत पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळतंय.

मदालसा शर्मा हिने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. मात्र, हे तिघे नेमके कुठे फिरायला निघाले, याबद्दल काही कळू शकले नाहीये. मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. मिथुन चक्रवर्ती हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

मिथुन चक्रवर्ती हे रूग्णालयात दाखल होते, त्यावेळेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर मिथुन चक्रवर्ती यांना भेटण्यासाठी काही भाजपाचे नेते रूग्णालयात गेले होते. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांना ओळखणे देखील कठीण असल्याचे त्या फोटोंवरून दिसत होते. आता थेट मिथुन चक्रवर्ती हे फिरण्यासाठी निघाले आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार