Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..

Mohammed Shami : 'मी तर माझ्या मुलीसोबत राहते, तू तर फार्महाऊसवर वेश्या बोलावतो त्यांच्यासोबत राहतोस आणि...', मोहम्मद शमीच्या बायकोने पुन्हा खळबळजनक आरोप केले आहेत.

Mohammed Shami : तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर..., बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..
Mohammed Shami
| Updated on: Aug 26, 2026 | 8:55 AM

Hasin Jahan On Mohammed Shami : भारतीय क्रिकेटसंघाचा क्रिकेटर मोहम्मद शमी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून मोहम्मद शमी आणि बायको हसीन शाह यांचे वाद सुरु आहे, जे संपण्याचं चिन्ह अद्याप तरी दिसत नाहीत. हसीन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद शमी याच्या निशाणा साधत असते. आता देखील हसीन हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मोहम्मद शमी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ‘मी तर माझ्या मुलीसोबत राहते, तू तर फार्महाऊसवर वेश्या बोलावतो त्यांच्यासोबत राहतोस…’, पोस्टमध्ये हसीन काय म्हणाली जाणून घ्या.

पोस्टमध्ये हसीन म्हणते, ‘बळजबरी कोणाच्या आयुष्यात घुसा त्यानंतर त्याची सन्मान भंग करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, तर तुझं स्वतःचं आयुष्य नरक बनेल. हा एक सिंपल लॉजिक आहे. समाजापासून लपून तू काळे कारनामे करतो. वेश्या ठेवणं हे नग्न आणि अपराधी लोकांचं काम आहे, जे तू करत आहेस.’

हसीन पुढे म्हणते, ‘तू फार्महाऊसवर वेश्यांना बोलावतो, त्यांचे वाढदिवस साजरे करतोस. मी जगासमोर 5 स्टार हॉटेलमध्ये मुलीचा वाढदिवस साजरा करते… आता सांग इज्जत आणि सन्मानाची गोष्ट कोणती आहे? तू देखील वेळेच्या प्रतिक्षेत आहेस आणि मी देखील वेळ आणि अल्लाहच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे… ‘

 

 

हसीन एवढ्यावरच थांबली नाही, ती पुढे संताप व्यक्त करत म्हणाली, ‘माझ्या लग्नाच्या तू प्रतिक्षेत आहेस ना? जर माझ्या नशिबात भटका कुत्राच लिहिला आहे, तर मी लग्नाबद्दल विचार तरी का करेल… त्यामुळे हे खयाली पुलाव शिजवणं बंद करत… तू ही प्रर्थना कधीच पूर्ण होणार नाही.’, अशी पोस्ट करत हसीन हिने संताप व्यक्त केला आहे.

सांगायचं झालं तर, हसीन वारंवार शमीला लक्ष्य करत अशा प्रकारच्या पोस्ट करत असते. अत्यंत अस्थिर आणि वादळी टप्प्यातून गेल्यानंतर त्यांचं वैवाहिक नाते संपुष्टात आलं. हसीनने शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते; यामध्ये मॅच-फिक्सिंग आणि विवाहबाह्य संबंधांपासून ते कुटुंबाला शारीरिक त्रास देण्यापर्यंतच्या आरोपांचा समावेश होता.

Follow Us