
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला ‘एल 2: एम्पुरान’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात 2002 च्या गुजरात दंगलीचा संदर्भ दाखवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. 25 मार्च रोजी ‘एम्पुरान’ हा चार विविध भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित झाला होता. परंतु गुजरात दंगलीच्या चित्रणामुळे उजव्या विचारसरणीच्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यातील काही दृश्यांवर कात्री चालवल्यानंतर तो पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘एम्पुरान’मधील 27 दृश्यांवर कात्री चालवण्यात आली आहे. हे संपूर्ण दृश्य जवळपास 127 सेकंदांचं होतं. या बदलानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नेमकं काय दाखवलंय, उजव्या विचारसरणीच्या लोकांचा नेमका काय आक्षेप आहे आणि एकंदर हा वाद काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. ‘एम्पुरान’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लुसिफर’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल म्हणजेच दुसरा भाग आहे. यामध्ये मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी स्टीफन नेदुमपल्ली आणि पृथ्वीराज...