
Burj Khalifa Stunt: बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड मोठ्या बजेटच्या सिनेमांमध्ये सीन देखील दमदार असतात. फायटिंग, ॲक्शन, लव्हसीन भरभरुन असतात… पण जेव्हा हिंमतीचा विषय येतो, तेव्हा एका अभिनेत्याचं नाव अव्वल स्थानी असतं… अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये प्राणघातक स्टंट केले आहेत. बुर्ज खलिफाच्या 130 व्या मजल्यावरून उडी मारुन अभिनेत्याने खतरनाक स्टंट केला, तेव्हा पाहणाऱ्यांच्या अंगावर देखील काटा आला… Mission Impossible Ghost Protocol सिनेमात बुर्ज खलिफा येथून दिलेला स्टंट कोणीच विसरु शकत नाही… आज देखील लोकांना विश्वास बसत नाही की, ते स्टंट अभिनेत्याने स्वतः केलं होतं. असे खतरनाक स्टंट करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता टॉम क्रूझ आहे… 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिशन इम्पॉसिबल 4’ सिनेमात टॉम क्रूझ याने बुर्ज खलिफा बिल्डिंगच्या काचांवर लटकून स्टंट केले होते.
टॉम क्रूझला त्याच्या सिनेमांमध्ये स्टंटसाठी ग्राफिक्स वापरणं आवडत नाही. सीन खरी वाटावीत म्हणून तो ती स्वतः करायला पसंत करतो. अनेक कलाकार त्यांच्या सिनेमांमध्ये धोकादायक सीनसाठी बॉडी डबल्स वापरतात. त्यानंतर एडिटींग करून अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांसमोर दाखवला जातो… पण टॉम क्रूझ असं करत नाही… त्याला आजच्या काळातील जॅकी चॅन देखील म्हटलं जातं…
‘घोस्ट प्रोटोकॉल’ मध्ये, टॉम क्रूझ म्हणजे सिनेमातील इथन हंट याला कर्ट हेंड्रिक्स उर्फ कोबाल्ट यांच्या मालकीच्या एका विनाशकारी शस्त्राचा शोध घेण्यासाठी दुबईला नेलं जातं. या सीनमध्ये इथनला 2 हजार 722 फूट उंच गगनचुंबी इमारतीच्या 130 व्या मजल्यावर पोहोचावं लागतं आणि लिफ्टऐवजी मॅगनेटचे हातमोजे वापरावे लागतात. 123 व्या मजल्यापर्यंत चढणं काही कठीण नव्हतं. कारण तिथपर्यंत अभिनेता दोरीच्या मदतीने खाली उतरतो… पण त्यानंतर अभिनेत्याला भयानक उडी मारावी लागते… तो सीन पाहिल्यानंतर सर्वांनाच धडकी भरते…
सांगायचं झालं तर, दुबईची शान बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे. जगातील सर्वात उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे… एखाद्या सामान्य माणसाला वरून खाली पाहताना देखील भीती वाटते पण, टॉम क्रूझ याने याच इमारतीच्या 130 व्या मजल्यावरून उडी मारताना आणि लटकताना स्वतः चित्रीकरण केलं. मॅगनेट हातमोजे घालून तो 11 मजल्यांवर चढला.
टॉम क्रूझ याने सीन करण्यासाठी हार्नेस आणि सेफ्टी केबल्सची मदत घेतली होती… पण स्टंट पूर्णपणे उंचीवरुन शूट करण्यात आलेला. रिपोर्टनुसार, सीन शूट करण्यापूर्वी अनेक महिने अभिनेत्याने सराव केलेला… हवेचा वेग, काचेवर स्वतःची पकड आणि नियंत्रण कायम ठेवणं… अनेक महिन्यांचा सराव पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्याने सीन शूट केला…
टॉम क्रूझ याची एक खास गोष्ट म्हणजे, तो कधीच धोक्याला घाबरत नाही, तो कायम परिस्थितीला आव्हान म्हणून सामोरे जातो. करियरसाठी टॉम क्रूझ अनेक भयानक स्टंट करण्यासाठी देखील तयार असतो… अभिनेत्याने यापूर्वी विमानातून लटकणे, हेलिकॉप्टर उडवणे आणि दुचाकीवरून धोकादायक उड्या मारणे असे स्टंट केले आहेत.