Mukesh Ambani : अंबानी यांची लिफ्ट पाहिलीत का? आपला 2 BHK पण पडेल फिका, पाहा Video

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानींच्या नावाचा समावेश आहे. तसंच प्रत्येकालाच अंबांनींच्या जीवनशैलीबाबत जाणून घ्यायची इच्छा असते. अशातच अंबानींच्या लिफ्टचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mukesh Ambani : अंबानी यांची लिफ्ट पाहिलीत का? आपला 2 BHK पण पडेल फिका, पाहा Video
| Updated on: May 18, 2023 | 8:20 PM

मुंंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला की मुकेश अंबांनींचं (Mukesh Ambani) नाव समोर येतंच. तसंच एखाद्या व्यक्ती श्रीमंत व्हायची स्वप्न बघतो तेव्हा तो मुकेश अंबानींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोच. कारण जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानींच्या नावाचा समावेश आहे. तसंच प्रत्येकालाच अंबांनींच्या जीवनशैलीबाबत जाणून घ्यायची इच्छा असते. कारण अंबानींचं राहणीमान एकदम रॉयल आहे.

नुकताच एका तरूणाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो तरुण मुकेश अंबानींच्या जियो कन्वेंशन सेंटरच्या लिफ्टमध्ये आहे. त्यानं या व्हिडीओत अंबानींची ती लिफ्ट दाखवली आहे जी एका घराएवढी मोठी आहे. विशेष म्हणजे त्या लिफ्टमध्ये खास सोयीसुविधा देखील आहेत.

 

तरुणाने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो म्हणत आहे की, मुंबईत लोकांच्या घरात सोफा ठेवायला जागा नाहीये आणि इथे अंबानींच्या लिफ्टमध्येच सोफा आहे. तसंच लोक त्यांच्या घरात झुमर लावायचं स्वप्न पाहतात पण इथे अंबानींच्या लिफ्टमध्येच झुमर आहे.

पुढे तो तरुण म्हणतो, अंबानीजी जेवढी मोठी तुमची लिफ्ट आहे तेवढंच मोठं घर मला गिफ्ट करा. तसंच ही लिफ्ट जियो वर्ल्ड सेंटरची जगातील सर्वात मोठी लिफ्ट आहे. सध्या या तरूणानं शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.