बिग बॉस 20 मध्ये मोठा ट्विस्ट! तिसऱ्याच आठवड्यात ‘हा’ स्पर्धक घराबाहेर, सलमान खाननं सांगितलं नाव
Bigg Boss 20 Eviction: सलमान खान 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये बिग बॉस २० मधून बाहेर पडणाऱ्या दुसऱ्या स्पर्धकाची घोषणा केली आहे.

‘बिग बॉस २०’ या रिॲलिटी शोमध्ये नाट्य आणि नाट्यमय घडामोडी सुरूच आहेत. बिग बॉसचे प्रेक्षक या आठवड्यातील एलिमिनेशनची आतुरतेने वाट पाहत होते. यंग डीएसए आणि ईशा रिखी हे दोन स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. शोच्या दुसऱ्या ‘वीकेंड का वार’ दरम्यान प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसमधून एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. त्याचे नाव आता समोर आले आहे.
पंजाबी अभिनेत्री आणि प्रसिद्ध रॅपर बादशाहची पूर्वाश्रमीची पत्नी ईशा रिखी घरातून बाहेर पडली आहे. सूत्रसंचालक सलमान खानने रविवारच्या एपिसोडमध्ये ईशाच्या एलिमिनेशनची घोषणा केली. यामुळे ईशा २० व्या सीझनमधून बाहेर पडणारी दुसरी स्पर्धक ठरली आहे. आपल्या तीन आठवड्यांच्या अल्प कालावधीत घरात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी ईशाने सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरी कमी मतांमुळे तिला अखेरीस शो सोडावा लागला.
या आठवड्यात घराबाहेर काढण्यासाठी नामांकित झालेल्या स्पर्धकांमध्ये ईशा रिखी आणि रॅपर यंग डीएसए यांचा समावेश होता. दोघांवरही बाहेर पडण्याची टांगती तलवार होती. पण प्रेक्षकांच्या मतांच्या बाबतीत यंग डीएसए विजयी ठरला. यंगला प्रेक्षकांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला, तर ईशाला सर्वात कमी मते मिळाली. या कमी मतसंख्येमुळे ईशा शोमधून बाहेर पडली. ईशा रिखीचा ‘ बिग बॉस ‘ घरातील तीन आठवड्यांचा प्रवास संमिश्र स्वरूपाचा होता.
या काळात तिच्या कामगिरीबद्दल आणि वृत्तीबद्दल प्रेक्षकांना आणि चाहत्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींना तिचा खेळ प्रभावी वाटला, तर अनेकांना असे वाटले की या कठीण स्पर्धेत तिच्याकडून अपेक्षित असलेला प्रभाव ती पाडू शकली नाही. हा तिचा पहिला मोठा रिॲलिटी शो होता. ईशा रिखीच्या आधी रोहिद खानलाही घरातून बाहेर काढण्यात आले होते. रोहिद आणि आता ईशाच्या जाण्याने बिग बॉस २० च्या घरात फक्त १४ स्पर्धक उरले आहेत.
दिवसेंदिवस घरातील स्पर्धा अधिकच तीव्र होत आहे. मात्र मिळालेल्या वृत्तानुसार, निर्माते लवकरच घरात वाईल्डकार्ड स्पर्धकांना आणण्याची तयारी करत आहेत. असे मानले जाते की, नवीन सदस्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण आणखी बदलेल आणि सध्याचे गट, मैत्री व शत्रुत्व पूर्णपणे विस्कळीत होतील. उर्वरित १४ स्पर्धकांसाठी पुढील मार्ग आणखी आव्हानात्मक असणार आहे.
