लैंगिक संबंधांसाठी दबाव, अभिनेत्याच्या फ्लॅटमध्येच मोलकरणीसोबत असं काय घडलं? धक्कादायक अपडेट समोर

काम सोडून गेलेल्या मोलकरणीला पुन्हा बोलावलं..., लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकत असलेल्या अभित्याने फ्लॅटमध्ये तिच्यासोबत काय केलं...? शेजरच्यांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर...

लैंगिक संबंधांसाठी दबाव, अभिनेत्याच्या फ्लॅटमध्येच मोलकरणीसोबत असं काय घडलं?  धक्कादायक अपडेट समोर
Crime
| Updated on: Mar 27, 2026 | 12:39 PM

मुंबई येथील मीरारोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे… जेथे 4 मुलांची आई असलेल्या मोकरणीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे… याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधात पोलीस आहेत… मिळालेल्या माहितीनुसार, एका छोट्या अभिनेत्याने महिलेची हत्या केली. अभिनेत्यानेच महिलेची चाकूने हत्या केली आणि फरार झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये दोन पुरुष राहत होते, तर महिला त्यांच्या घरात कमासाठी यायची… त्यामुळे घराच्या चाव्या महिलेकडे देखील होत्या. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. मृत महिलेची ओळख सुमन कांबळे अशी झाली असून ती फक्त 36 वर्षांची होती….

मिळालेल्या माहितीनुसार, सुमन तिचा पती आणि चार मुलांसोबत काशिमिरा परिसरात राहत होती. ती घरोघरी जाऊन काम करायची आणि मीरा रोड पूर्वेकडील साई बाबा नगरमधील चंद्रेश अकॉर्ड्स इमारतीत देखील काम करायची. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरात घटना घडली आहे, तेथे राहणार अभिनेता 42 वर्षांचा आहे.

आरोप असे आहेत की, गेल्या एक महिन्यापासून कथित आरोपी सुमन हिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. पण महिलेने त्याचा कायम विरोधच केला… याबद्दल महिलेने तिच्या कुटुंबियांना देखील सांगितलं होतं. महिलेने अभिनेत्याच्या मोठ्या भावाला याबद्दल सांगितलं आणि काम सोडून दिलं.

पण काही दिवसांनंतर आरोपीच्या भावाने पुन्हा महिलेला फोन केलं आणि कामावर परतण्याची विनंती केली आणि छोटा भाऊ आता घरी नसल्याचा तिला सांगितलं. याच विश्वासावर महिला पुन्हा कामावर त्यांच्या घरी गेली… बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता महिला कामावर पोहोचली. पण तेव्हा कथित अरोपी घरात होता. अशात सुमन घरात येत्याने त्याने तिच्यावर चाकून हल्ला केला आणि फरार झाला. तेव्हा गंभीररित्या जखमी असलेली सुमन दरवाजापर्यंत पोहोचली..

शेजारच्यांनी जेव्हा तिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं, तेव्हा तात्काळ जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आलं. उपचारा दरम्यान पोलिसांनी महिलेला मृत घोषित केलं… पोलिसांच्या सूत्रांनुसार, प्राथमिक तपासात या कटात मोठ्या भावाचा कोणताही सहभाग असल्याचे उघड झाले नाही. गेल्या दोन दिवसांत दोन्ही भावांमध्ये कोणतेही फोन कॉल झाले नाहीत आणि मोठ्या भावाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

सध्या, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us