आंदोलनात जाणे भोवले, थेट सोडावा लागणार भारत, आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानला मोठा दणका..

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला मोठा दणका पोलिसांकडून देण्यात आला. हेच नाही तर त्याला थेट देश सोडून जाण्यास सांगण्यात आले. तशी नोटीस पोलिसांकडून पाठवण्यात आली. हा अभिनेत्याला मोठा धक्का म्हणावा लागेल.

आंदोलनात जाणे भोवले, थेट सोडावा लागणार भारत, आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानला मोठा दणका..
Imran Khan Aamir Khan
| Updated on: Oct 15, 2026 | 10:32 AM

अभिनेता इम्रान खान याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. थेट दणका देण्यात आला. 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस त्याला देण्यात आली. 28 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला भारत सोडावा लागेल. अभिनेता आमिर खान यांचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांकडून ही नोटीस देण्यात आली. 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे मुंबई पोलिसांनी निर्देश दिली आहेत. हा अभिनेत्याला मोठा दणका म्हणावा लागेल.  मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर थेट आता इम्रान खानला आता भारत सोडावा लागणार आहे.

या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी इम्रान खान याला ताब्यात घेतले होते. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसतानाही आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. इम्रान खान हा भारतीय नागरिक नाही. इमिग्रेशन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. 28 ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्याचे नोटिशीत निर्देश आहेत.

Loading...

इम्रान खानने मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्याची गर्लफ्रेंड, लेखा वॉशिंग्टन आणि चुलत भाऊ, झैन मारी खान हेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी कारवाई करत या तिघांनाही ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आता इम्रान खानच्या अडचणीत वाढ झाली. त्याला थेट भारत सोडावा लागणार आहे.

मुंबई पोलिसांनी इम्रान खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेता इम्रान खान, अली भोजानी आणि इतर 300 ते 400 जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून तो अमेरिकेचा नागरिक आहे. त्याच्याकडे भारताचे नव्हे तर अमेरिकेचे नागरिकत्व आहे. आता इम्रान खान नक्की भारत कधी सोडणार हे पाहण्यासारखे आहे. इम्रान खानने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us