Musafir Cafe: ‘मुसाफिर कॅफे’चं खरं लोकेशन खूपच सुंदर; वीकेंडसाठी इतकं भाडं

Musafir Cafe Mussoorie Real Location: 'मुसाफिर कॅफे' या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेला कॅफे तुम्ही खऱ्या आयुष्यातही पाहू शकता. उत्तराखंडमधील मसुरी याठिकाणी ही जागा आहे.

Musafir Cafe: मुसाफिर कॅफेचं खरं लोकेशन खूपच सुंदर; वीकेंडसाठी इतकं भाडं
musafir cafe in mussoorie
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2026 | 3:38 PM

Musafir Cafe Mussoorie Real Location: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज चांगलीच गाजतेय. या सीरिजमधील कलाकारांचं दमदार अभिनय, कथानक आणि शूटिंग लोकेशन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिव्य प्रकाश दुबे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ही सीरिज असून यात एक सुंदर कॅफे पहायला मिळतो. या कॅफेचं लोकशन पाहून तुम्हाला तिथे जाऊन काही निवांत क्षण घालवावेसे वाटतील. हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे. विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये उत्तराखंडचं सौंदर्य दाखवण्यात आलं आहे. या सीरिजमध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, जी पाहिल्यावर तुम्हाला शहराच्या धावपळीपासून दूर डोंगरांमध्ये काही दिवस राहायला जावंसं वाटेल.

मुसाफिर कॅफेचं खरं ठिकाण

या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेलं सुंदर कॅफे हे कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर तयार केलेलं ठिकाण नाही, तर मसुरीमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे. वेब सीरिज पाहिल्यानंतर जर तुम्हाला ते ठिकाण प्रत्यक्षात पहायचं असेल तर मुसाफिर कॅफेचं खरं ठिकाण असलेल्या मसुरीमधील झरिपानी कॅसलला भेट द्या. मसुरीतील एका टेकडीवर वसलेली ही जुनी ऐतिहासिक वास्तू तिच्या सुंदर स्थापत्यकलेसाठी आणि व्हॅलीच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. सभोवतालची हिरवळ आणि पर्वतांची दृश्ये या ठिकाणाला आणखी खास बनवतात.

पहा फोटो-

झरीपानी कॅसल ही ब्रिटिश काळात बांधलेली एक जुनी इमारत आहे, जी आजही पर्यटकांना आकर्षित करते. इथे कधी तुम्हाला धुक्यात हरवलेले पर्वत दिसतील, तर कधी हिरवाईने वेढलेली विस्तीर्ण दरी. जर तुम्हाला गर्दी नसलेली आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायला आवडणारी ठिकाणं आवडत असेल, तर झरीपानी कॅसल तुमच्यासाठी उत्तम ठिकाण ठरू शकतं.

वीकेंडच्या मुक्कामासाठी किती खर्च?

  • लॉग हट- 17,500 ते 20000 रुपयांपर्यंत (कपलसाठी)
  • डीलक्स लॉग हट- 23,000 ते 26,000 रुपयांपर्यंत
  • सँटोरिनी डीलक्स रुम- 30,000 ते 33,000 रुपयांपर्यंत
  • डीलक्स रुम- 32,000 ते 35,000 रुपयांपर्यंत
  • सँटोरिनी सुइट- 60,000 रुपयांहून अधिक

जर तुम्ही झरीपानी कॅसलला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही ट्रिप फक्त त्या एका जागेपुरती मर्यादित ठेवू नका. मसूरी आणि लँडोरमध्ये इतरही अनेक ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us