AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅरेजमध्ये सुरू केलं काम, आज 16,000 कोटींचा मालक; ‘रामायण’च्या निर्मात्याने शाहरुख खानलाही टाकलं मागे !

हुरुन रिच लिस्टमध्ये शाहरुख खान सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी ठरला आहे. पण संपत्तीच्या बाबती रामायणच्या निर्मात्याने त्यालाही मागे टाकलं आहे. कोण आहे तो ?

गॅरेजमध्ये सुरू केलं काम, आज 16,000 कोटींचा मालक; ‘रामायण’च्या निर्मात्याने शाहरुख खानलाही टाकलं मागे !
| Updated on: Sep 24, 2026 | 7:11 PM
Share

बॉलिवूडमधील अनेक स्टार्सकडे गडगंज संपत्ती आहे, पण सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये कोण-कोण आहे याचा नुकताच खुलासा झाला. हरुन रिच इंडिया ची 2026 या वर्षाची लिस्ट जाहीर झाली असून यावर्षीही शाहरुख खानने (Shah Rukh Khan) बाजी मारली आहे. सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून त्याचं नाव घोषित करण्यात आलं आहे. तो बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार आहेत. शाहरुखचं नेटवर्थ सध्या 10 हजार कोटी रुपये आहे. त्याचा अव्वल क्रमांक कायम राहिला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या संपत्तीत तब्बल 2490 कोटींची घट झाली आहे. मात्र, किंग खानपेक्षाही जास्त नेटवर्थ कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का ? त्याचं नावंही समोर आलं आहे. शाहरुख खानलाही मागे टाकणारे हे ‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा यांचं कुटुंब आहे.

हो हे खरं आहे ! नमित मल्होत्रा भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एका कुटुंबातून येतात. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026 नुसार, मल्होत्रा कुटुंबाच्या संपत्तीत 279 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नमित यांचे वडील नरेश मल्होत्रा हे व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनी प्राइम फोकसचे मालक आहेत. आता मल्होत्रा कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 16,000 कोटी रुपये झाली असून, हुरुनच्या यादीत ते 232 व्या क्रमांकावर आहेत. याआधी हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये नमित मल्होत्रा हे 2206 व्या स्थानावर होते. तेव्हा त्यांची संपत्ती साधारण 9204 कोटी रुपये इतकी होती.

नमित आणि नरेश मल्होत्रा आहेत तरी कोण ?

नमित मल्होत्रा हे केवळ चित्रपट निर्माते नाहीत, तर व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते चित्रपट निर्माते नरेश मल्होत्रा यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. नरेश मल्होत्रा यांनी आपल्या कारकिर्दीत ‘दुनिया मेरी जेब में’ (1979), अमिताभ बच्चन स्टारर ‘शहेशाह’ (1988) आणि ‘सहारी बाघा’ (1985) यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

गॅरेजपासून सुरुवात, आज श्रीमंतांच्या यादीत समावेश

रिपोर्ट्सनुसार, नमित मल्होत्रा यांच्या यशाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने झाली. 1995 साली त्यांनी आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये व्हिडिओ वर्कशॉप सुरू करत बिझनेसच्या दुनियेत पाऊल टाकलं. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या ‘व्हिडिओ वर्क्स’ या प्रोडक्शन बॅनरसह त्यांच्या कंपनीचं विलीनीकरण केलं. ‘प्राइम फोकस’ असं नाव या नव्या कंपनीला देण्यात आलं. पुढल्या काळात प्राइम फोकसने भारताबाहेरही मोठा विस्तार केला. लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि व्हँकुव्हर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कंपनीने आपला व्यवसाय पोहोचवला.

यानंतर ब्रिटनमधील व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनी डबल निगेटिव्ह (DNEG) सोबत प्राइम फोकसचे विलीनीकरण झालं. DNEG ने ‘इंसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’, ‘ड्यून’ आणि ‘ड्यून: पार्ट टू’ यांसारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांच्या व्हिज्युअल इफेक्ट्सवर काम केलं आहे. नमित मल्होत्रा सध्या DNEG चे चेअरमन आणि सीईओ आहेत.

तब्बल 4,000 कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘रामायण’

सध्या हेच नमित मल्होत्रा त्यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या निर्मितीत तयार होत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचे बजेट सुमारे 4 हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवी दुबे आणि सनी देओल यांसारखे कलाकार अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा