Nana Patekar : मेकअप नकोय मला…माधुरी दीक्षितवर चिडलेले नाना पाटेकर, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग; काय घडलेलं?

Madhuri Dixit On Nana Patekar : माधुरी दीक्षितनं नाना पाटेकर यांच्यासोबत 'प्रहार' या सिनेमात एकत्र काम केलेलं. अभिनेत्रीनं यादरम्यानचा किस्सा सांगितला आहे.

Nana Patekar : मेकअप नकोय मला...माधुरी दीक्षितवर चिडलेले नाना पाटेकर, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग; काय घडलेलं?
| Updated on: Nov 04, 2026 | 9:14 PM

अभिनेते नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. त्यांच्या अभिनयाइतकाच त्यांचा काम करण्याचा वेगळा अंदाजही नेहमी चर्चेत असायचा. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला देखील नानांसोबत काम केलं आहे. नुकताच ‘कोण होणार करोडपती’च्या दिवाळी विशेष भागात माधुरीनं ‘प्रहार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगितला. हा प्रसंग सांगताना तिनं नाना पाटेकर यांच्या कामाप्रती असलेल्या दृष्टिकोनाची आठवण करून दिली.

‘मेकअप नकोय मला…’ नानांनी माधुरीला दिली होती सूचना

Loading...

माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांनी १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रहार’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः नाना पाटेकर यांनी केलं होतं. या चित्रपटात डिंपल कपाडिया यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नानांनी माधुरीला मेकअप न करण्यास सांगितलं होतं. याबद्दलचा किस्सा सांगताना माधुरी म्हणाली, ‘मी नानांसोबत ‘प्रहार’ चित्रपट केला होता. त्यावेळी नाना मला म्हणाले होते, ‘मेकअप नकोय मला…’ त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी फक्त चेहरा धुऊन सेटवर गेले. मात्र, सेटवर आल्यानंतर नानांनी माधुरीला मेकअप केला आहे की नाही, अशी विचारणा केली. त्यावर तिनं मेकअप केला नसल्याचं सांगितलं. नानांना तिचं उत्तर पटलं नाही. त्यांनी तिला चेहरा दाखवण्यास सांगितलं.

मेकअप रिमूव्हरने पुसून दाखवला चेहरा

माधुरीने पुढे सांगितलं की, नानांनी तिच्याकडे मेकअप नसल्याचा पुरावा मागितला. त्यानंतर मेकअप रिमूव्हर आणण्यात आलं. माधुरीनं त्यानं आपला चेहरा पुसून नानांना दाखवला. त्यावर नानांनी तिचा चेहरा पाहिला आणि ‘हा, आता बरोबर आहे’ असं म्हटलं. माधुरीने हा किस्सा सांगताच कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही नानांच्या या स्वभावाची आठवण झाली. नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींमुळे दोघीही भावूक झाल्या.

 

‘कोण होणार करोडपती’च्या दिवाळी विशेष भागात माधुरी दीक्षित आणि सोनाली कुलकर्णी यांच्यातील गप्पांमधून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना सोनालीही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

नाना सर आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याची भावना सोनालीनं व्यक्त केली. त्यांच्याशिवायची ही पहिली दिवाळी असल्याचं सांगताना तिच्या भावना अनावर झाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us