Nana Patekar: पत्नीपासून 35 वर्ष वेगळे राहिले नाना पाटेकर, मनिषा कोईरालासोबत अफेअर पण.., प्रसिद्ध लेखकाचा मोठा खुलासा

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. नाना पाटेकर यांनी लग्न तर केलं, पण 35 वर्ष पत्नीपासून वेगळे राहिले, तर लग्नानंतर देखील त्यांचं 'या' दोन अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याच्या र्चर्चांनी जोर धरलेला.

Nana Patekar: पत्नीपासून 35 वर्ष वेगळे राहिले नाना पाटेकर, मनिषा कोईरालासोबत अफेअर पण.., प्रसिद्ध लेखकाचा मोठा खुलासा
Nana Patekar Manisha Koirala
| Updated on: Oct 11, 2026 | 9:54 AM

Nana Patekar: मराठी आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वाल घेतला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, कार्डियक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. 8 ऑक्टोबर 2026 रोजी नानांनी अखेरचा श्वास घेतला आणि झगमगत्या विश्वावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला… अशात आता नानांच्या निधनानंतर त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, नाना पाटेकर कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले. नाना पाटेकर यांचं लग्न अभिनेत्री निलाकांती यांच्यासोबत झालं. पण दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. नाना पाटेकर आणि निलाकांती पाटेकर 35 वर्षांपासून वेगळे पाहत होते. पण त्यांचा घटस्फोट झाला नाही.

तर नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्यासोबत देखील झाली. नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांनी ‘खामोशी’, ‘अग्नि साक्षी’, ‘युगपुरुष’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली. 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘योगपुरुष’ सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आणि खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला.

Loading...

लेखकाची प्रतिक्रिया…

रिपोर्टनुसार, लेखक रणबीर पुष्प यांनी एका मुलाखतीत, नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं, म्हणालेले, ‘त्या दोघांमध्ये काहीतरी तर नक्कीच होतं. आता ती मैत्री होती की रोमान्स…. दोघांमध्ये फार घट्ट नातं होती. दोघांचं नातं देखील चांगलं होतं. दोघे एकत्र बसून सीनबद्दल चर्चा करायचे. पण दोघांचं सेटवर जास्त लक्ष नसायचं, काही सीन बघायचे आणि निघून जायचे…’, असं रणबीप पुष्प म्हणाले.

पण नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचं नातं फार काळ टिकलं नाही. रिपोर्टनुसार, याच दरम्यानस नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा आयेशा झुल्का हिच्यासोबत देखील रंगू लागली. ‘आंच’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. काही रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, मनिषा हिने आयेशा आणि नाना पाटेकर यांना रंगेहाथ पकडलं होचं.. त्यानंतर संतापलेल्या मनिषा हिने नाना यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडून टाकले. नाना पाटेकर, आयेशा आणि मनिषा यांच्याबद्दल कोणतीच अधिकृत गोष्ट समोर आली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us