AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Petekar : ‘निधनानंतर अत्याचार करणारा कधीच…’, तनुश्री दत्ताला प्रसिद्ध अभिनेत्रीची साथ, सर्वत्र चर्चांना उधाण

Nana Petekar : अभिनेते नाना पेटकर यांनी अनेकांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा नानांसोबत फार वाईट अनुभव असल्याचं अनेकदा समोर आलं. तनुश्री हिने नानांच्या निधनानंतर देखील वादग्रस्त वक्तव्य केलं. आता तिच्यासोबत आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री उभी राहिली आहे.

Nana Petekar : 'निधनानंतर अत्याचार करणारा कधीच...', तनुश्री दत्ताला प्रसिद्ध अभिनेत्रीची साथ, सर्वत्र चर्चांना उधाण
| Updated on: Oct 09, 2026 | 1:16 PM
Share

Nana Petekar : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेकांच्या मनावर राज्य केलं. आपल्या अभिनयातून त्यांनी बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री एक नवीन ओळख मिळवून दिली. पण या प्रवासात त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. 2018 मध्ये मीटू मिहिमेअंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर गंभीर आरोप केले. पण नानांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले. आता त्यांच्या निधनानंतर देखील तनुश्री नाना पाटेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. ज्यावर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे. आता याप्रकरणात तनुश्री हिला अन्य एका अभिनेत्रीची देखील साथ मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संध्या मृदुल आहे.

संध्या हिने सोशल मीडियावर पोस्ट करत तनुश्री हिचं समर्थन केलं आहे. पोस्ट शेअर करत संध्या म्हणते, ‘कोणाच्या मृत्यूनंतर त्यांनी कोणाचं केलेलं नुकसान विसरता येत नाही. अत्याचार करणाऱ्याने शेवटचा श्वास घेतल्यानंतर अत्याचाराचं सत्य खोटं ठरु शकत नाही आणि लोकं श्रद्धांजली वाहत असले तरी, आरोप खोटे ठरत नाहीत. व्यक्तीच्या निधनानंतर शोक व्यक्त करणं काही चुकीचं नाही. जेव्हा एका व्यक्तीचं कौतुक होतं, तेव्हा पीडित व्यक्तीला कोणी लक्षात ठेवत नाही. तेव्हा पुन्हा असं वाटतं की, सत्य पुन्हा लपलं..’

पुढे संध्या म्हणते, ‘निधनानंतर अत्याचार करणार, अत्याचार करणारा राहत नाही? त्यांच्याकडून झालेलं नुकसान देखील संपून जातं? पीडित व्यक्तीसाठी असं होत नाही.’, पुढे कॅप्शनमध्ये संध्या म्हणते, ‘पीडित व्यक्तीला त्यात वाईट अनुभवांसोबत जगावं लागतं… मी कायम पीडित व्यक्तीच्या बाजूने उभी आहे.’ यावर संध्या हिने #METOO असं कॅप्शन देखील दिलं आहे. पण पोस्टमध्ये कुठेच संध्याने नाना पाटेकर यांचं नाव घेतलं नाही. पण तनुश्री हिने केलेल्या वक्तव्यनंतर तिची प्रतिक्रिया समोर आली. म्हणून चर्चांना उधाण आलं आहे.  ज्यावर अनेकांनी निराशा देखील व्यक्त केली आहे.

Follow Us
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद