AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : ‘निधन झालं म्हणून कांड विसरु…’, नानांच्या निधनावर तनुश्री दत्ता रोखठोक म्हणाली, Video व्हायरल

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर प्रत्येक जण दुःखी आहे. पण अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांच्या निधनानंतर देखील त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रोखठोक म्हणाली आहे.

Nana Patekar : 'निधन झालं म्हणून कांड विसरु...', नानांच्या निधनावर तनुश्री दत्ता रोखठोक म्हणाली, Video व्हायरल
नाना पाटेकर - तनुश्री दत्ता
| Updated on: Oct 09, 2026 | 12:32 PM
Share

Nana Patekar : एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेल. पण नाना पाटेकर यांनी अभिनेत्रीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर देखील तनुश्री हिने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सध्या तनुश्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री म्हणतेय, ‘निधन झालं म्हणून त्याने केलेले कांड विसरु…’, जाणून घ्या पुढे अभिनेत्री काय म्हणाली.

व्हिडीओ पोस्ट करत तनुश्री म्हणाली, ‘इतक्या रात्री लाईव्ह येण्याची गरज नव्हती, पण माझ्याबद्दल जी नकारात्मकतेची लाट वाहत आहे, म्हणजे मला काही कळत नाही, लोकं इतके मुर्ख कसे असू शकतात. एखाद्या व्यक्तीसोबत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. पण एका व्यक्तीसोबत मला आलेला अनुभव मला माहिती आहे ना… आणि मला तर जुने मुद्दे पुन्हा बोलायचे नव्हते. यासाठी मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. काही दिवसांनंतर मी प्रतिक्रिया देईल असं ठरवलं होतं.

‘ज्या व्यक्तीचं निधन झालं आहे, म्हणून असं तर नाही ना त्याने आयुष्यात कितीही कांड केले आहेत, त्यावर बहिष्कार टाकला जाईल. त्याने जेवढ्या लोकांना त्रास दिला आहे, त्याचं खातं काय बंद होऊन जातं का? आणि लोक माफ करुन टाक असं म्हणत आहे. अरे… देव देखील माफी मागितल्याशिवाय माफ करत नाही. जर देवाकडून माफीची अपेक्षा कोणी ठेवत असेल तर, त्याच्या मनात देखील पश्चातापाची भावना हवी.’

‘सर्वात आधी तर माफी मागावी लागते. केलेला गुन्हा कबूल करावा लागतो. मी कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे? मी कोणासोबत तरी वाईट केलं आहे…? मी टोळी करत एका व्यक्तीचं जगणं कठीण केलं होतं…’, असं देखील तनुश्री दत्ता म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जी मुलगी आठवड्यातून 5 वेळा वर्कआऊट करायची. जी मुलगी बिनधास्त जग फिरत होती. मी जेव्हा माझ्या करियरच्या उच्च शिखरावर होती तेव्हा देखील माझ्यासोबत असं काही घडलं नाही. पण मी टू चळवळीनंतर माझ्यासोबत काय – काय झालं हे मी सांगू देखील शकत नाही. माझ्या गाडीचे ब्रेक्स कापले होते. मी पूर्णपणे थकलेली. काली मंदिरात जाऊन मी रोज रडायची आणि एकच प्रार्थना करायची, या लोकांना माझ्या आयु्ष्यातून हटव ज्यांना मला त्रास दिला आहे. ‘

‘नाना पाटेकर यांच्यासोबत काम करत असताना मी फक्त 24 वर्षांची होती. त्यानंतर सेटवर जाण्याची मला इच्छा देखील होत नव्हती. मला सतत भीती वाटायची. तो एत सैतान नाही, महा सैतान होता… माझ्या काली माँचा चमत्कार आहे… मला त्रास द्यायला त्यांना फार मजा यायची आणि आता त्यांचं निधन माझ्यासाठी एक चमत्कार आहे. त्या सर्वांना विचारा ज्यांना त्यांनी (नाना पाटेकर) यांनी त्रास दिली आहे आणि आता जे त्यांनी श्रद्धांजली वाहत आहेत, तुम्ही कधी त्यांना भेटले असते तर माहिती झालं असतं..’, असं देखील तनुश्री दत्ता रोखठोकपणे म्हणाली.

Follow Us
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं