AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Purnima 2026: कार्तिक पौर्णिमेला करा लक्ष्मी मातेचे ‘हे’ उपाय; दूर होईल घरातील गरिबी, वाढेल धनसंपत्ती

कार्तिक पौर्णिमेचा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी आणि धनलाभ होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

Kartik Purnima 2026: कार्तिक पौर्णिमेला करा लक्ष्मी मातेचे ‘हे’ उपाय; दूर होईल घरातील गरिबी, वाढेल धनसंपत्ती
Kartik Purnima 2026
| Edited By: | Updated on: Nov 23, 2026 | 9:54 PM
Share

कार्तिक पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. यंदा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, विधीपूर्वक लक्ष्मी मातेची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. तसेच, या दिवशी काही खास उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते, असे मानले जाते. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करता येतील.

श्री यंत्राची पूजा करा

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री यंत्राची विधीपूर्वक पूजा करावी. धार्मिक मान्यतेनुसार, श्री यंत्राची पूजा केल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि सुख-समृद्धी टिकून राहते.

देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा

या दिवशी देवी लक्ष्मीला सात्त्विक खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. यासाठी बदाम, केशर, गाईचे शुद्ध दूध किंवा मखाना वापरून खीर तयार करू शकता. ही खीर लक्ष्मी मातेला अर्पण करून त्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करावी.

लक्ष्मी चालीसाचे पठण करा

धनाशी संबंधित अडचणी दूर व्हाव्यात आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळावी, यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी श्री लक्ष्मी चालीसाचे पठण करावे. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

देवी लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण करा

कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या पूजेत एकाक्षी नारळ अर्पण करावा. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी हा नारळ देवीला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो नारळ तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे घरात समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरातील कोणताही कोपरा अंधारात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. घराच्या मुख्य दरवाजावर आवर्जून दिवा लावावा. तसेच, पौर्णिमेच्या रात्री संपूर्ण घरात पुरेसा प्रकाश राहील, याकडे लक्ष द्यावे.

सोने किंवा चांदी खरेदी करा

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीची कृपा मिळावी आणि घरातील सुख-समृद्धीत वाढ व्हावी, यासाठी शक्य असल्यास या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करू शकता.

गरजू व्यक्तींना दान करा

या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार दान करावे. अन्न, पाणी, कपडे, पैसे, फळे, तूप, भांडी किंवा धणे यांसारख्या वस्तूंचे दान करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेला दानधर्म केल्याने पुण्यलाभ होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू