‘नायक’चा विलेन रंगाला संपवण्याचा कट… सावत्र भावाने विष दिलं… काळ्या जादूसाठी अभिनेत्याची लुंगी, खणलेला खड्डा आणि…

नायक'चा विलेन रंगाच्या वडिलांच्या 4 बायका... सावत्र भावाने केलेला अभिनेत्याला संपवण्याचा रचला कट... सर्वात आधी विष दिलं... त्यानंतर रात्रीची काळी जादू... अभिनेत्याची लुंगी, खणलेला खड्डा आणि... भयानक आहे सत्य ...

नायकचा विलेन रंगाला संपवण्याचा कट... सावत्र भावाने विष दिलं... काळ्या जादूसाठी अभिनेत्याची लुंगी, खणलेला खड्डा आणि...
Ponnambalam
| Updated on: Feb 14, 2026 | 9:29 AM

हा क्रूर चेहरा आजही तुमच्या लक्षात असले. विषेशतः ज्यांनी अभिनेता अनिल कपूर स्टारर ‘नायक’ सिनेमा पाहिला आहे. ते या खालनायकाला विसरूच शकणार नाहीत. ‘नायक’ सिनेमात अभिनेत्याने रंगा नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती. जो एक दिवसासाठी झालेले मुख्यमंत्री अनिल कपूर यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतो… झगमगत्या विश्वात खलनायक म्हणून प्रसिद्धी झोतात आलेल्या अभिनेत्याचं नाव पोन्नम्बलम असं आहे. मोठ्या पडद्यावर पोन्नम्बलम क्रूर दिसतो. पण खऱ्या आयुष्यात पूर्णपणे उटलं आहे. पोन्नम्बलम याने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. पोन्नम्बलम मारण्यासाठी सावत्र भावाने कट रचला होता… पोन्नम्बलम याला विष दिलं, त्यानंतर काळी जादू देखील केली. पोन्नम्बलम याने एका मुलाखतीत सावत्र भावावर गंभीर आरोप केले…

इंडस्ट्रीमध्ये करियर करत असताना पोन्नम्बलम याने दिग्दर्शनात देखील स्वतःचं नशीब आजमावलं. स्वतःची ओळख भक्कम करत असताना अभिनेत्याची अचानक तब्येत खालावली… पोन्नम्बलम याची किडनी फेल झाली… अशी बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे पोन्नम्बलम मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असं देखील कळलं. सतत दारू पित असल्यामुळे पोन्नम्बलम याची किडनी फेल झालं… असं देखील संगण्यात येऊ लागलं. पण 2023 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली.

मुलाखतीत पोन्नम्बलम म्हणालेला, ‘माझी किडनी फेल झाली याचं कारण माझी दारू पिण्याची सवय आणि अन्य प्रकारच्या नशा कराणं नव्हतं. अनेक लोकांना देखील असंच वाटतं… याची मला खंत आहे… माझ्या वडिलांच्या 4 बायका होत्या आणि आम्ही 11 मुलं… तिसऱ्या बायकोचा लहान मुलगा काही काळ माझा मॅनेजर होता. त्यान एकदा माझ्या बीयरमध्ये विष टाकलं होतं… त्याचा परिणाम माझ्या किडनीवर झालेला. मला माहिती देखील नाही त्याने असं का केलं होतं… उपचारांनंतर डॉक्टरांनी माझ्या शरीरातून विषारी पदार्थ काढले… कसं आणि काय झालं मला काहीच माहिती नव्हतं…’

पोन्नम्बलम पुढे म्हणाला, ‘एक रात्र मला झोपच येत नव्हती… तेव्हा मी सिगरेट पिण्यासाठी बाहेर आलो… तेव्हा मी माझ्या सहाय्यकाला आणि भावाला काही अंतरावर उभं असलेलं पाहिलं. त्यांनी एक खड्डा खणलेला होता. त्यामध्ये माझी लुंगी, एक बाहुली आणि काही पवित्र धागे होते… सुरुवातीला काही काळ मी फक्त काय सुरु आहे ते पाहत होतो. दुसऱ्या दिवशी मी सहाय्यकाला एका खोलीत बंद केलं आणि धमकावलं… त्या रात्री माझ्या भावासोबत मिळून काय करत होतास..? असं मी संतापात विचारलं… तेव्हा त्याने मला सर्वकाही सत्य सांगितलं… माझी प्रसिद्धी आणि लोकप्रियता माझ्या भावाला आवडत नव्हती… त्यामुळे त्याने मला संपवण्याचा कट रचला होता…’

पोन्नम्बलम म्हणाला, माझ्या कोणत्याच भावासाठी माझ्या मनात वाईट भावना नव्हती… पण त्याने जे काही केलं, त्यामुळे मला फार मोठा धक्का लागला होता… सांगायचं झालं तर, पोन्नम्बलम याने फार कमी वयात काम करण्यास सुरुवात केली. अभिनेत्याने त्याच्या करियरमध्ये तब्बल 1500 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे… पोन्नम्बलम अद्यापही सिनेमांमध्ये सक्रिय आहे… Vangala Viriguda सिनेमातून अभिनेता चाहच्यांच्या भेटीस येणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर, पोन्नम्बलम याने अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us