“कधी वाटलं नव्हतं अशा व्यक्तीवर प्रेम..”; नीना गुप्ता यांनी व्यक्त केलं दु:ख

लग्नाविना गरोदर होत्या नीना; बऱ्याच वर्षांनंतर बोलून दाखवलं दु:ख

कधी वाटलं नव्हतं अशा व्यक्तीवर प्रेम..; नीना गुप्ता यांनी व्यक्त केलं दु:ख
Neena Gupta, Vivian Richards
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 08, 2022 | 2:42 PM

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं अफेअर सर्वश्रुत आहे. आयुष्यात कोणतेही निर्णय प्लॅनिंग करून घेतले नाही, असं नीना म्हणतात. मात्र जे काही घडलं तो देवाचा मास्टरप्लॅन होता, असंही त्या मानतात. नीना गुप्ता या लग्नाआधी आई झाल्या होत्या. मुलगी मसाबाचं संगोपन त्यांनीच केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या.

80 आणि 90 च्या दशकात भारतीय समाजात एकल माता म्हणून बाळाचं संगोपन करणं किती कठीण होतं, याविषयी नीना यांनी सांगितलं. नीना आणि विवियन कधीच एकत्र राहिले नाहीत. “मी याचा कधीच विचार केला नव्हता की मी एका अशा व्यक्तीवर प्रेम करेन, ज्याच्यासोबत मी कधी एकत्र राहू शकत नाही. मी फक्त परिस्थितीचा सामना करत गेले”, असं त्या म्हणाल्या.

“मी कधी हार नाही मानली. जे निर्णय मी घेतले होते, त्यावर मी ठाम राहिली. कधीच कोणाकडे मी आर्थिक मदत किंवा भावनिक साथ मागितली नाही. परिस्थितीचा सामना केला, झेलले, सहन केलं आणि एन्जॉयसुद्धा केलं. याव्यतिरिक्त मी आणखी काय करू शकले असते? एकतर मी रडत बसले असते किंवा मग माझ्याशी लग्न करण्याची विनंती केली असती. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केल्यानंतर पुढचा मार्ग मला देवानेच दाखवला”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.