New Year 2023: सहा महिने, 12 मेगा बजेट चित्रपट, ‘या’ सहा स्टार्सच्या नशिबाची कसोटी; पहा संपूर्ण यादी

| Updated on: Jan 01, 2023 | 1:43 PM

नव्या वर्षातील पहिले 6 महिने बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचे; बिग बजेट चित्रपटांच्या शर्यतीत कोण ठरणार सुपरस्टार?

New Year 2023: सहा महिने, 12 मेगा बजेट चित्रपट, या सहा स्टार्सच्या नशिबाची कसोटी; पहा संपूर्ण यादी
New Year 2023: सहा महिने, 12 मेगा बजेट चित्रपट, 'या' सहा स्टार्सचं भवितव्य पणाला
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: 2023 या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. 2022 हे वर्ष बॉलिवूड चित्रपटांसाठी काही खास नव्हतं. वर्षभरात ‘द काश्मीर फाइल्स’, ‘भुल भुलैय्या 2’, ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ आणि ‘दृश्यम 2’ या चार चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं. आता नव्या वर्षातील पहिले सहा महिने बॉलिवूडसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण या सहा महिन्यात शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, प्रभास, रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि आयुषमान खुराना यांच्या नशिबाची कसोटी लागणार आहे.

25 जानेवारी रोजी शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या आधी 13 जानेवारी रोजी दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि गायिका रेखा भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुत्ते’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन वर्षातील दुसरा महिना कार्तिक आर्यन आणि अजय देवगणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या चित्रपटाचा रिमेक ‘शहजादा’मधून कार्तिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक आणि क्रिती सनॉनचा हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय. तर 17 फेब्रुवारी रोजी अजय देवगणचा स्पोर्ट्स बायोपिक ‘मैदान’ हा बॉक्स ऑफिसच्या मैदानात उतरणार आहे.

हे सुद्धा वाचा

मार्चमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लव रंजनचा हा चित्रपट 8 मार्च रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 30 मार्च रोजी अजय देवगणचा आणखी एक चित्रपट ‘भोला’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: अजयनेच केलं आहे. ‘कैथी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक आहे.

एप्रिल महिन्यात सलमान खान आणि रणवीर सिंग यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा बहुचर्चित चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या बॉलिवूडच्या कोणत्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र त्याच्या पुढील महिन्यात, म्हणजेच जूनमध्ये चार महत्त्वपूर्ण चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहेत. जुनच्या पहिल्या शुक्रवारी शाहरुख खानचा ‘जवान’, त्याच्या दोन आठवड्यांनंतर प्रभासचा ‘आदिपुरुष’, 23 जून रोजी आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ आणि 29 जून रोजी कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ हे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.