Jhalak Dikhhla Ja 10: निती टेलरला का बाहेर काढलं? डबल एलिमिनेशनमुळे परीक्षक नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Niti Taylor: 'झलक दिखला जा 10'मधून निती टेलरची अचानक एग्झिट; परीक्षकांवर भडकले चाहते

Jhalak Dikhhla Ja 10: निती टेलरला का बाहेर काढलं? डबल एलिमिनेशनमुळे परीक्षक नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Niti Taylor
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2022 | 12:47 PM

मुंबई: ‘झलक दिखला जा 10’ या डान्स शोच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. मात्र त्याच्याआधी हा शो डबल एलिमिनेशनमुळे चर्चेत आला आहे. एकाच एपिसोडमध्ये दोन स्पर्धकांना बाद केल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या डबल एलिमिनेशनमध्ये निया शर्मा आणि निती टेलर या दोघींना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावरून चाहतेसुद्धा संताप व्यक्त करत आहेत. ‘झलक दिखला जा 10’ शोमधून बाहेर पडल्यानंतर निया आणि नितीने सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली आहे.

सर्वांत कमी मतं मिळालेल्या चार स्पर्धकांमध्ये निती टेलर, निया शर्मा, निशांत भट्ट आणि फैजल शेख यांचा समावेश होता. शोचे परीक्षक माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही यांनी जाहीर केलं की निया शर्माला सर्वांत कमी मतं मिळाली आहेत. त्यामुळे आधी नियाला बाद करण्यात आलं. मात्र त्याचसोबत त्यांनी डबल एलिमिनेशन जाहीर केलं.

निया शर्मासोबत निती टेलरलाही शोमधून बाहेर काढण्यात आलं. निती टेलरला मागच्या एपिसोडमध्ये कमी गुण मिळाल्याने तिला बाद करत असल्याचं सांगण्यात आलं. यावरूनच चाहत्यांनी राग व्यक्त केला. ट्विटरवर वाहिनी आणि परीक्षकांवर नेटकऱ्यांनी टीका केली.

निती टेलरला चुकीची वागणूक दिली, असा आरोप नेटकरी करत आहेत. नितीनेही ट्विटरवर काही चाहत्यांना उत्तरं दिली. डबल एलिमिनेशन हा माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा धक्का होता, असं ती म्हणाली. ‘तू प्रेक्षक आणि चाहत्यांची फेव्हरेट आहेस, तू सर्वांची मनं जिंकलीस’, असं एकाने लिहिलं. त्यावर उत्तर देताना नितीने लिहिलं, ‘चॅनचीही फेव्हरेट असती तर बरं झालं असतं’.