AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या शोकसभेतूनच हेमा मालिनींना डावललं नाही… याआधी देखील अभिनेत्रीला कुटुंबापासून ठेवलं दूर

Hema Malini - Dharmendra : धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबियांनी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींना कायम लांब ठेवलं! फक्त धर्मेंद्र यांची शोक सभाच नाहीतर, याआधी देखील अनेकदा आली अशी वेळ..., सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांची चर्चा...

धर्मेंद्र यांच्या शोकसभेतूनच हेमा मालिनींना डावललं नाही... याआधी देखील अभिनेत्रीला कुटुंबापासून ठेवलं दूर
| Updated on: Nov 29, 2025 | 3:12 PM
Share

Hema Malini – Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांना जुहू येथील घरी नेण्यात आलं… राहत्या घरीच धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर 27 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

देओल कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. पण धर्मेंद्र यांच्या शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि आहाना दिसल्या नाही. हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरात धर्मेंद्र यांच्यासाठी पूजा ठेवली होती…

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांत हेमा मालिनी यांना पतीला भेटू देखील दिलं नाही… धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हेमा मालिनी यांना पतीसोबत राहायचं होतं.. ही पहिली वेळ नाही जेव्हा हेमा मालिनी यांनी देओल कुटुंबापासून वेगळं ठवण्यात आलं… याआधी देखील असं अनेकदा झालं आहे.

दिग्गज अभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या मुलाचं 18 जून 2023 रोजी मोठ्या थाटात लग्न झालं. देओल कुटुंबातील मुलाच्या लग्नात अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण लग्नात किंवा लग्नापूर्वीच्या विधींमध्ये धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि सनी देओल यांच्या सावत्र आई हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत.

शिवाय हेमा मालिनी यांच्या वाढदिवशी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीमध्ये देखील फक्त धर्मेंद्र उपस्थित होते. सनी देओल आणि बॉबी देओल पार्टीत दिसले नाही. त्यामुळे तेव्हा देखील धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबातील वाद समोर आले.

धर्मेंद्र यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यामुळे हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला 43 वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी तडजोड करत आयुष्य जगत आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची शेवटची भेट देखील झाली नाही… असं देखील सांगण्यात येत आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक