कोणालाच असं आयुष्य नको असतं कारण…, दुसऱ्या बायकोचं लेबल, हेमा मालिनी यांची खंत
Hema Malini - Dharmendra : लग्नानंतर कधीच नाही राहिले एकत्र... हेमा मालिनी यांच्यापुढे दुसऱ्या बायकोचं लेबल... खंत व्यक्त करत म्हणालेल्या, 'कोणालाच असं आयुष्य नको असतं कारण...'

Hema Malini – Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज धर्मेंद्र आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील… धर्मेंद्र कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले… पहिलं लग्न आणि चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटला… पण हा प्रवास दोघांसाठी देखील फार कठीण होता.. धर्मेंद्र यांनी समाजाच्या विरोधात जात हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आणि हेमा मालिनी यांच्यावर अनेकांना निशाणा साधला.. 1980 मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं… पण दोघे कधीच एकत्र राहिले नाहीत.. आता धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला ज्यामुळे हेमा मालिनी पूर्णपणे कोलमडल्या आहे… पतीसोबत कधीच एका छता खाली राहता आलं नाही, म्हणून हेमा यांनी तक्रार केली नाही की, धर्मेंद्र यांचा कधी तिरस्कार केला नाही…
सांगायचं झालं तर हेमा मालिनी कधीच त्यांच्या नात्यावर व्यक्त झाल्या नाहीत. पण ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या त्यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांनी स्वतःच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे… धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी ‘दुसऱ्या बायको’चा लेबल देण्यात आला…
यावर हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘लोकांनी आमच्यावर अनेक आरोप केले… माझ्या मागे अनेक गोष्टी होत राहिल्या… पण मला एकच गोष्ट माहिती होती ती म्हणजे, मला धर्मेंद्र आनंदी ठेवतात आणि मला आयुष्यात फक्त आनंद हवा होता…’, एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांच्यावर नजर ठेवणारी पोलीस अधिकारी.. असं देखील हेमा मालिनी यांना म्हटलं.
यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘मी कोणती पोलीस अधिकारी नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवायला… धर्मेंद्र मला भेटायला किती दिवस येतात हे मला कोणाला सांगण्याची गरज नाही… ते वडिलांचं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत… मला त्यांना कधीच याची आठवण करून द्यावी लागली नाही. मला कोणालाही नाराज करायचं नव्हतं. म्हणून आम्ही वेगळे राहिलो. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे केले त्याबद्दल मी आनंदी आहे.’
2023 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आयुष्याची अशी स्थिती कोणता आदर्श नाही … कोणत्याच व्यक्ती अशा आयुष्याची अपेक्षा करत नाही. जे काही आहे मी त्याचा स्वीकार केला आहे… कोणालाच असं आयुष्य नको असतं…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक महिलेला पती आणि मुलांसोबत सामान्य आयुष्य हवं असतं… पण ठरवल्यासारखं काही झालं नाही.. मला याबद्दल वाईट किंवा दुःख वाटत नाही. मी स्वत: च्या आयुष्यात आनंदी आहे. मला दोन मुली आहेत आणि मी त्यांना खूप चांगलं वाढवलं आहे.” ईशाने एका मुलाखतीत असंही सांगितलं होतं की, तिचे वडील रात्री तिच्यासोबत राहत नव्हते.’
