Bachchan Family: ‘या’ कारणामुळे कधीच नाही होऊ शकत ऐश्वर्या – अभिषेक यांचा घटस्फोट! जाणून व्हाल थक्क

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan: फक्त 'हे' एक कारण, ज्यामुळे वाद असले तरी कधीच नाही होऊ शकत ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट! जाणून तुम्हीही व्हाल थक्क, सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा...

Bachchan Family: या कारणामुळे कधीच नाही होऊ शकत ऐश्वर्या - अभिषेक यांचा घटस्फोट! जाणून व्हाल थक्क
| Updated on: Aug 09, 2024 | 9:59 AM

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण अद्याप कुटुंबातील एकाही सदस्याने यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर बच्चन कुटुंबाचीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या एकटी मुलगी आराध्या सोबत पोहोचली. तर अभिषेक मात्र संपूर्ण कुटुंबासोबत लग्नात पोहोचला. तेव्हा देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. आता चाहते असा दावा करत आहेत की, दोघांमध्ये वाद असले तरी ऐश्वर्या – अभिषेक यांचा कधीच घटस्फोट होऊ शकत नाही… यामागचं कारण देखील तसंच आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण दोघांमध्ये नक्की काय झालंय यामागे काय कारण आहे समजू शकलेलं नाही. ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी एकत्र मिळून लेक आराध्या हिचा सांभाळ केला आहे. मुलाखतीत अभिषेक म्हणाला होता, ‘आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याला काम करायचं असेल तर, मी मुलीचा सांभाळ करण्यासाठी तयार आहे…’

सांगायचं झालं तर, बच्चन कुटुंबात कधीच घटस्फोट झाले नाहीत. हेच कारण आहे ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्यात कटूता आल्यानंतर देखील दोघे एकत्र आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर बिग बी अभिनेत्री रेखा यांच्या प्रेमात पडले. पण त्यांनी कायम कुटुंबाला प्राधन्य दिलं आणि रेखा यांच्यावर असलेल्या प्रेमाचा त्याग केला.

श्वेता बच्चन आणि निखिल नंदा

जेव्हा अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा साखरपुडा मोडला तेव्हा श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांच्या नात्यात दुरावा आला. आता श्वेता अधिक काळ वडील अमिताभ बच्चन यांच्या घरात असता. कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी श्वेता – निखिल यांचा घटस्फोट झाला नाही… असं देखील सांगितलं जातं.

आईसोबत राहाचे ऐश्वर्या?

बच्चन कुटुंबात असलेले मतभेद पाहाता ऐश्वर्या राय लेक आराध्या हिच्यासोबत तिच्या आईच्या घरी राहाते.. अशा चर्चा देखील तुफान रंगल्या. ऐश्वर्या – अभिषेक यांचा घटस्फोट होऊ नये अशी चाहत्यांची इच्छा आहे. पूर्वीप्रमाणे अनेक ठिकाणी आता दोघे कधीच एकत्र दिसत नाही. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.