OTT Release This Week: ‘हनुमान अंश’ची भक्ती ते ‘दृश्यम 3’चा सस्पेन्स; या आठवड्यात ओटीटीवर ब्लॉकबस्टर सीरिज-सीरिजचा पाऊस!

OTT Release This Week: 'हनुमान अशं' आणि 'दृश्यम 3', दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता तुम्हाला घरबसल्या फक्त हे दोनच सिनेमे नाही तर, अन्य सिनेमे देखील पाहता येणार आहेत. ज्यामुळे तुमचा विकेंड खास होईल, तर जाणून घ्या कोणते सिनेमे तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहेत..

OTT Release This Week: हनुमान अंशची भक्ती ते दृश्यम 3चा सस्पेन्स; या आठवड्यात ओटीटीवर ब्लॉकबस्टर सीरिज-सीरिजचा पाऊस!
| Updated on: Nov 28, 2026 | 8:49 AM

OTT Release This Week: 2026 मध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमांनी बक्कळ कमाई देखील केली. अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे ‘हनुमान अशं’ आणि ‘दृश्यम 3’, दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विकेंडला सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे आणि सीरिज पाहू शकता. तर जाणून घ्या ‘हनुमान अशं’ आणि ‘दृश्यम 3’ यांच्यासोबत कोणते सिनेमे आणि सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

सिनेमाचं नाव – ‘हनुमान अंश’

Loading...

प्लॅटफॉर्म – सोनी लिव आणि नेटफ्लिक्स

जर तुम्हाला भक्ती आणि आध्यात्माशी निगडीत कोणता सिनेमा पाहायचा असेल तर तुम्ही ‘हनुमान अंश’ सिनेमा पाहू शकता. सिनेमा निम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने बक्कळ कमाई केली. आता ओटीटीवर ‘हनुमान अंश’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमा 27 नव्हेंबर रोजी सोनी लिव वर तर 29 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

सिनेमाचं नाव – ‘ढाई चाल’

प्लॅटफॉर्म – जिओ हॉटस्टार

‘ढाई चाल’ ही लेखक नवीन चौधरी यांची एक प्रसिद्ध हिंदी पॉलिटिकल थ्रिलर कादंबरी आहे, ज्यावर आधारित वेब सीरिज आणि टीव्ही शो 27 – 28 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाले आहेत. जिओ हॉटस्टारवर तुम्हाला ही सीरिज पाहता येणार आहे. सीरिजमध्ये गगन अरोरा, अंकित सिवाच, राजेश कुमार आणि अंजलि तत्रारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सिनेमाचं नाव – दृश्यम 3

प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स

अभिनेता अजय देवगण स्टारर ‘दृश्यम’ सिनेमाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमाचे पहिले दोन भाग हिट ठरल्यानंतर तिसऱ्या भागाने देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अजय देवगण याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत झळकले.

सिनेमाचं नाव – सुपरगर्ल

प्लॅटफॉर्म – जिओ हॉटस्टार

सुपरगर्ल सिनेमाची कथा कारा जोर-एलची आहे, जी आपल्या क्रिप्टो नावाच्या कुत्र्यासोबत अवकाश सफरीवर निघते. या प्रवासात तिची भेट रूथये नावाच्या मुलीशी होते. रूथयेला तिच्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो. तिच्या कुटुंबाला ‘क्रेम ऑफ द येलो हिल्स’ने ठार मारले होते आणि क्रिप्टोलाही इजा पोहोचवली होती.

सिनेमाचं नाव – स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे

प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स

स्पायडर-मॅनच्या चाहत्यांसाठीही या आठवड्यात एक खास भेट आहे. ‘स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे’मध्ये टॉम हॉलंड पुन्हा एकदा पीटर पार्करच्या भूमिकेत दिसणार आहे. या कथेत डॉक्टर स्ट्रेंजच्या जादूनंतरच्या चार वर्षांनंतरची दुनिया दाखवण्यात आली आहे. त्या जादूप्रयोगामुळे सर्वजण पीटर पार्करची खरी ओळख विसरले आहेत. दरम्यान, पीटरला स्वतःच्या आत काही विचित्र आणि वेदनादायक बदल जाणवू लागतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us