इंडिया आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बैठकीकडे फिरवणार पाठ, दिल्लीत..
परिसीमन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची जोरदार चर्चा होत आहे. इंडिया आघाडीने दिल्लीत महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच आता शरद पवारांच्या खासदारांनी मोठा निर्णय घेतला.

देशाच्या राजकारणात तूफान चर्चा ठरली आहे ती म्हणजे परिसीमन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची. मोदी सरकारने हे बिल संसदेत मंजूर करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला आमचा पाठिंबा असल्याचे म्हणत सर्वांना धक्काच दिला. हा इंडिया आघाडीला धक्का होता. मात्र, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या दाव्यानंतर सावध भूमिका घेतली. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नसल्याचे म्हटले. एकीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड विधेयकाला आमच्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हणताना दिसले तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेत हात वर केले.
परिसीमन विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे सूर बघायला मिळत आहेत. पक्षाकडूनच कालच स्पष्ट करण्यात आले की, इंडिया आघाडीने बोलावलेल्या बैठकीला सुप्रिया सुळे जाणार नाहीत. त्यातच आता सूत्रांकडून मोठी माहिती मिळत आहे. हा इंडिया आघाडीला धक्काच म्हणावा लागणार आहे. शरद पवार यांचा पक्ष वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीला पवारांच्या एनसीपीचा एकही खासदार जाणार नाही. इंडिया आघाडीने ही बैठक बोलावली. पण या बैठकीत पवारांच्या पक्षाचा एकही खासदार नसणार आहे. दुसरीकडे शरद पवार रूग्णालयात आहेत. शरद पवारांना माझगावच्या कॅन्सर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी अगोदरच या बिलाबद्दल पक्षाची भूमिका मांडली आहे. मोठ्या घडामोडी घडताना दिल्लीत दिसत आहेत. इंडिया आघाडीने बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला इंडिया आघाडीचा घटक असतानाही शरद पवारांचे खासदार पाठ फिरवणार आहेत. यावरून काँग्रेसने जोरदार टीका केली. मात्र, सुप्रिया सुळे याबाबत अजूनही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. काल यावर संजय राऊत यांनीही भाष्य केले होते. शरद पवार यांचा पक्ष नक्की काय निर्णय घेतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
