Paach Footacha Bachchan OTT release: पाच फुटाचा बच्चन हा सिनेमा पाहिलात का? आता घर बसल्या पाहाता येणार

Paach Footacha Bachchan OTT release: पाच फुटाचा बच्चन हा सिनेमा आता ओटीटी प्लटॅफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. जर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहिला नसेल तर घर बसल्या पाहाता येणार आहे.

Paach Footacha Bachchan OTT release: पाच फुटाचा बच्चन हा सिनेमा पाहिलात का? आता घर बसल्या पाहाता येणार
Paach Footacha Bachchan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 9:02 AM

करोना काळानंतर अनेकांचा सिनेमे घर बसल्या पाहण्याकडे कल असतो. चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघण्याऐवजी स्वत:च्या सोयीनुसार वेळ मिळेल तसा सिनेमा पाहण्याकडे आजही अनेकांचा कल असतो. त्यामुळे नवे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता मराठी सिनेमा पाच फुटाचा बच्चन हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? वाचा…

आपल्या वेगळ्या नावामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला पाच फुटाचा बच्चन हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रसिक प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती. आता घरबसल्या हा सिनेमा पाहाता येणार आहे.

Loading...

काय आहे सिनेमाची कथा?

“पाच फुटाचा बच्चन” या चित्रपटाचे लेखन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एकीकडे भोंदू कीर्तनकारांची चर्चा सुरू असताना, खरा कीर्तनकार कोण आणि कीर्तनपरंपरेचा मूळ गाभा काय, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट लक्षवेधी ठरतो. समता, सामाजिक जाणीव आणि संतविचारांचा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो.

चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. श्रुती मधुदीप या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे. तसेच कौस्तुभ रमेश देशपांडे याची खिळवून ठेवणारी कथा आणि खुसखुशीत संवाद यासाठी प्रेक्षक खास दाद देत आहेत. अभिनेते किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे, क्षितीश दाते असे अनेक परिचित चेहरे या चित्रपटात आहेत. त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. समतेची वाट दाखवणारा, आयुष्यातील नकारात्मक गोष्टी वजा करण्याची प्रेरणा देणारा आणि प्रेम व सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा हा चित्रपट कुटुंबासह पाहण्यासारखा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us