पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसोबत रेखा यांचा ‘तो’ व्हिडीओ, 36 वर्ष जुना व्हिडीओ पाहताच म्हणाल…

Pakistan Former PM and Rekh old Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री रेखा यांचा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे... व्हिडीओ जवळपास 36 वर्ष जुना आहे...

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसोबत रेखा यांचा तो व्हिडीओ, 36 वर्ष जुना व्हिडीओ पाहताच म्हणाल...
| Updated on: Aug 23, 2025 | 11:53 AM

Pakistan Former PM and Rekh old Video: झगमगत्या विश्वात काय होईल काहीही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखा, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान दिसत आहेत. व्हिडीओमध्ये विनोद खन्ना, रेखा आणि इमरान खान डान्स करताना दिसत आहे… सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 1989 पाकिस्तान येथे झालेल्या सिंगिंग कॉन्सर्टचा आहे… सिंगिंग कॉन्सर्टमध्ये विनोद खन्ना आणि रेखा पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. व्हिडीओनध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद खन्ना आणि रेखा सुरुवातीला एकत्र डान्स करताना दिसतात. विनोद खन्ना पाकिस्तानी अभिनेत्री बाबरा शरीफ आणि माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादसोबत डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर रेखा देखील डान्स करायला येतात आणि मग विनोद खन्ना इमरान खान यांना डान्स करायला ओढतात.

जवळपास 36 वर्ष जुना आहे व्हिडीओ

सांगायचं झालं तर, व्हिडीओ जवळपास 36 वर्ष जुना आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी जुन्या आठवणी ताज्या करत आहेत. शिवाय भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवर देखील नेटकरी बोलताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘भारत आणि पाकिस्तानच्या यूनिटीबद्दल चर्चा होत आहे…’, ‘भारत-पाकिस्तान संबंध पूर्वी चांगले होते, पण ते जाणूनबुजून बिघडवले गेले आहेत.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘भारत-पाकिस्तानने असंच एकत्र राहिलं पाहिजे.’

 

 

याशिवाय, अनेक वर्ष जुना व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना दिवंगत विनोद खन्ना यांचीही आठवण आली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘क्या बात है… विनोद खन्ना जी खूप आनंदी दिसत आहेत.’ त्याच वेळी, काही नेटकऱ्यांनी इमरान खान यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की ते आता तुरुंगात आहेत.

अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज रेखा पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असतात. सांगायचं झालं तर, एक काळ असा देखील होता जेव्हा रेखा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान  इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी  जोर धरला होता… पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आजही रेखा अविवाहित आहेत.