पलाश मुच्छलच्या घरातील ‘तो खास कोपरा’ पाहिलात का? पहिल्या नजरेतच भरतेय ही गोष्ट

संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलचे आलिशान घर सध्या चर्चेत आहे. त्याचे संपूर्ण घर एका खास थीमवर आधारित आहे. मुख्य म्हणजे त्याच्या घरात एक असा खास कोपरा आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसेच तो कोपरा खास असण्यामागे कारणही तसचं आहे. ते नेमकं काय आहे जाणून घेऊयात.

पलाश मुच्छलच्या घरातील तो खास कोपरा पाहिलात का? पहिल्या नजरेतच भरतेय ही गोष्ट
Palash Muchhal's house is all white; it catches the eye as soon as you see it
Image Credit source: Instagram
Updated on: Dec 01, 2025 | 1:26 PM

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना क्रिकेटसोबतच आता ती तिच्या आणि पलाश मुच्छलच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फारच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या नात्याबद्दल तसेच एकंदरीतच सुरु असलेल्या वादाबद्दलच चर्चा सुरु आहे. तसेच पुढे जाऊन नक्की यांचे लग्न होणार की नाही याबद्दल जाणून घेण्यास चाहते देखील उत्सुक आहेत. पण या सर्व घटनांदरम्यान आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे ती म्हणजे पलाशच्या घराची. होय, कारण पलाशच्या घराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात त्याच्या घराचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

पलाश मुच्छल हा उत्तम संगीत दिग्दर्शक आहे तसेच तो करोडपती देखील आहे. त्याने अल्पवयातच अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. दरम्यान पलाशच्या घराच्या थीमने चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं घर हे संपूर्ण व्हाईट-थीमच आहे.

पलाशच्या घराचे फोटो पाहिल्यास सर्वत्र फक्त व्हाईट थीमच दिसते. भिंतींपासून पडद्यांपर्यंत, फर्निचरपासून शेल्फपर्यंत. सगळीकडचा पांढऱ्या रंग नक्कीच मनात शांत वातावरण निर्माण करतो. घरात पांढरा रंग जास्त असल्याने जागा मोठी वाटते, प्रत्येक कोपरा खास वाटतो. प्रकाश परावर्तित झाल्यामुळे खोली अधिक उजळ दिसते आणि घरात एक नैसर्गिक शांतता जाणवते. तसेच डोळ्यांना देखील त्रास होत नाही.

पलाश मुच्छलच्या घरातील ती खास जागा

पलाश मुच्छलच्या घरातील सर्वात खास भाग म्हणजे संगीतासाठी तयार केलेला खास कोपरा, ज्याची शोभा ग्रँड पियानो वाढवतो. घरातील व्हाईट थीममध्ये हा पियानो अजूनच उठून दिसतो. पियानोजवळ असलेली सुंदर व्हाईट टेक्श्चर भिंत, त्यावर पडणाऱ्या वॉर्म लाईट्सची डिझाईन आणि तसेच घरात असलेली हिरवीगार झाडे सगळं मिळून एक अत्यंत आकर्षक आणि शांत वातावरण तयार होतं. कोपऱ्यात कमीत कमी वस्तू ठेवल्यामुळे तो अधिक एलिगंट आणि नीटनेटका दिसतो.

​घरातील लाईटींग

घरातील अजून एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ​घरातील लाईटींग. पांढऱ्या वातावरणात वॉर्म येलो लाईट्समुळे आणखी शोभा येते. घराला एक सौम्य, उबदार लूक देतात. पलाशने घरात छतामधील किव्ह लाईटिंग, कोपऱ्यातील फ्लोअर लॅम्प आणि भिंतीवर स्पॉटलाईट्स या विविध प्रकारच्या लाईट्स वापरल्या आहेत. या लाईटिंगमुळे घरात केवळ प्रकाशच वाढत नाही, तर प्रत्येक कोपरा आकर्षक आणि आरामदायी दिसतो.

 


मिनिमल आणि एलिगंट फर्निचर

पलाशच्या घरातील फर्निचर देखील खूप हलके, साधे आणि आधुनिक डिझाइनचे आहे. व्हाईट थीमला मॅचिंग व्हाईट सोफा, लहान काचचे टेबल, क्लीन लाईन्स असलेले कॅबिनेट आणि ओपन वॉल शेल्फ यांसारख्या वस्तूंमुळे घरात अवजडपणा वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक खोली मोकळी, खुली आणि नीटनेटकी दिसते, तसेच घराची संपूर्ण मिनिमल आणि एलिगंट शैली अधोरेखित होते.

अत्तर आणि परफ्यूमसाठी वेगळी जागा

पलाशच्या घरात अत्तर आणि परफ्यूमसाठी एक स्वतंत्र सेल्फ कॉर्नर बनवण्यात आला आहे. याठिकाणी छोटा व्हाईट कॅबिनेट, सौम्य लाईट्स आणि नीट मांडलेले परफ्यूम व अत्तरांच्या बॉटल्स ठेवण्यात आले आहेत. या कॉर्नरमुळे घराला केवळ लक्झरी लूक मिळत आहे.