Kajol : काजोलसोबत दिला सुपरहिट सिनेमा, 3 वर्षांपासून मिळत नाहीये काम; पत्नी वयाच्या 64व्या वर्षी करतेय बक्कळ कमाई

शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील कुलजीतची भूमिका आजही अनेकांना आठवते. ही भूमिका साकारणारा परमीत सेठी पुढे काय करतो आणि त्याची पत्नी कोण आहे, जाणून घ्या.

Kajol : काजोलसोबत दिला सुपरहिट सिनेमा, 3 वर्षांपासून मिळत नाहीये काम; पत्नी वयाच्या 64व्या वर्षी करतेय बक्कळ कमाई
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 14, 2026 | 10:30 PM

शाहरूख खान आणि काजोलचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. या सिनेमातील गाणी आजही लग्नात वाजवली जातात.तरूणाईला आजही ती गाणी थिरकायला भाग पाडतात. पण चित्रपटात सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारणार कुलजीत आठवतोय का? पण काही सिनेमे केल्यानंतर अचानक कुलजीत सिनेसृष्टीतून गायबच झाला. तोच कुलजीत आता काय करतोय? कसा जगतोय? हे तुम्हाला माहित आहे का? या कुलजीत आता सिनेमात काम करत नाही पण कुलजीतची बायको प्रचंड श्रीमंत आहे. वयाच्या 64 व्या वर्षीही ती लाखोंमध्ये कमाई करते.

कुलजीतची भूमिका साकारणारा अभिनेता परमीत सेठी याने DDLG मध्ये सिमरन आणि राजच्या प्रेमात अडथळा आणला होता, पण खऱ्या आयुष्यात मात्र त्याची जोडी अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांच्यासोबत जमली. 1995 मध्ये DDLG रिलीज झाला ज्यात परमीत ने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली. त्याच्या नकारात्मक भूमिकेने सर्वांच्या मनावर छाप पाडली. यानंतर त्याने ‘दिलजले’, धडकन, कच्चे धागे, मेला, लक्ष्य बाबुल आणि दिल धडकने दो यांसारख्या चित्रपटांत काम केलं. अभिनयासोबचत त्याने दिग्दर्शनातही नशीब आजमावले. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या बदमाश कंपनी या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केल होतं.

Loading...

अर्चना पूरण सिंहसोबत कशी जमली जोडी

परमीत सेठी आणि अर्चना पूरण सिंह यांनी 1992 मध्ये लग्न केलं.परमीत हा अर्चनापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या काळात लग्न झालेल्या अभिनेत्रींच्या कामावर परिणाम होण्याची भीती होती. त्यामुळे काही काळ आपलं लग्न त्यांनी जाहीरचं केल नव्हतं.अर्चना गरोदर झाल्यावर त्यांनी लग्नाची बातमी सार्वजनिक केली.

या जोडप्याला आता आर्यमान आणि आयुष्यमान अशी दोन मुलं आहेत. अर्चना पूरण सिंह या विनोदी कार्यक्रमांमधील परीक्षक म्हणून विशेष लोकप्रिय झाल्या. त्यांच्या खळखळून हसण्याचीही सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते

अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास

परमीत सेठीने चित्रपटांसोबत दूरचित्रवाणी मालिकांमधेही काम केलं आहे. ‘जस्सी जैसी कोई नही’ आणि ‘स्पेशल ऑप्स’ यांसारख्या मालिकांमध्येही तो दिसला होता.DDLG मधील कुलजीतच्या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली असली तरी त्याने पुढे वेगवेगळ्या भूमिका आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात काम सुरू ठेवलं.

आज अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी हे दोघेही त्यांच्या कौटुंबिक व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पडद्यावर सिमरनचा होणारा नवरा म्हणून दिसलेला परमीत खऱ्या आयुष्यात अर्चनाचा जोडीदार बनला, ही त्यांच्या चाहत्यांसाठी आजही रंजक गोष्ट आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us